अक्षय कुमारच्या या हिरोईनला ओळखलंत का?, रातोरात झाली स्टार; अभिनय सोडून बनली बौद्ध भिक्षू By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 2:23 PM1 / 8मनोरंजसृष्टीतील असे अनेक चेहरे आहेत ज्यांना जितक्या वेगाने यश मिळालं तितक्याच वेगाने ते इंडस्ट्रीतून रातोरात गायब झाले. कोणी वेगळाच व्यवसाय सुरु केला तर कोणी अक्षरश: अध्यात्माकडे वळलं. 2 / 8ही त्या अभिनेत्रीची गोष्ट आहे जिच्या सौंदर्याने ऐश्वर्या राय, सुष्मिता सेन या विश्वसुंदरींनाही टक्कर दिली. 1994 साली सुष्मिता सेन मिस इंडिया विजेती ठरली तर ऐश्वर्या राय रनर अप होती. तेव्हाच एका अभिनेत्रीला मिस इंडिया टुरिजम हा खिताब मिळाला. 3 / 8ही अभिनेत्री म्हणजे बरखा मदन (Barkha Madan). बरखा आता झगमगत्या दुनियेपासून खूप लांब गेली आहे.1996 साली आलेला 'खिलाडियो का खिलाडी' या अक्षय कुमारच्या सिनेमातून तिने पदार्पण केलं. सिनेमात मुख्य भूमिका नसली तरी 'जेन' या व्यक्तिरेखेने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती.4 / 8यानंतर बरखालाही मुख्य भूमिका मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. ६ वर्ष तिने प्रयत्न केले. तिचा तिच्या अभिनय क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. शेवटी तिला कष्टाचं फळ मिळालं जेव्हा राम गोपाल वर्मांच्या 'भूत' सिनेमात तिला भूमिका मिळाली. तिने मंजित खोसला हे भूताचंच कॅरेक्टर केलं होतं. 5 / 8तिच्या 'भूत'मधील कामाने अनेक मेकर्सचं लक्ष वेधून घेतलं. मॉडेल, अभिनेत्री व निर्माती अशी तिची ओळख. तिने हिंदी व पंजाबी सिनेमात काम केलं. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली. काही शो तिने होस्ट केलेत. ही बरखा सध्या कुठे आहे?6 / 82012 साली बरखाने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय जाहीर केला. लामा जोपा रिनपोछे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कर्नाटकातील एका मठात बौद्ध भिक्षा घेतली. तिने स्वत:च्या नावातही बदल केला. ग्याल्टेन सैमटेन असं तिने नाव ठेवलं. 7 / 8बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी तिने स्वत:ला वाहून घेतलं. याला तिच्या कुटुंबाचंही समर्थन होतं. सध्या ती तिबेटच्या के सेरा मठात बौद्ध ननच्या रुपात शांत जीवन जगत आहे. तेथील व्हिडिओ, फोटोही ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. कधीकधी ती लद्दाखमधूनही फोटो शेअर करत असते.8 / 8बरखा म्हणाली होती की, तिच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले आहे, पण काहीतरी कमी आहे असे तिला वाटत होते. तिने आई-वडिलांना आपल्या मनातले सांगितल्यावर त्यांनीही तिला साथ दिली. यानंतर त्यांनी नवीन आयुष्य सुरू केले. आणखी वाचा Subscribe to Notifications