Join us

PHOTOS: गळ्यात मोत्याचा हार अन् कानात मॅचिंग झुमके; जान्हवी कपूरचा बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 9:12 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते. गाऊनपासून ते कॅज्युअल पेहरावात दिसणारी जान्हवी चाहत्यांना भुरळ घालते. अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असतो.
2 / 10
जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता तिने काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
3 / 10
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर सिक्विन बीड साडीत दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवी कपूरची स्टाईल आणि लूक तिच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे.
4 / 10
आपल्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावणारी जान्हवी कपूर या फोटोंमध्ये अशाच लूकमध्ये दिसत आहे. जान्हवी या सिक्विन बीडेड साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
5 / 10
याशिवाय अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते. जान्हवीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
6 / 10
जान्हवी कपूरने गळ्यात मोत्याचा हार आणि कानात मॅचिंग झुमके घातले आहेत. याशिवाय तिच्या हातात दोन हिऱ्याच्या बांगड्या दिसत आहेत. तिने तिच्या किलर पोझने चाहत्यांना आपलेसे केले.
7 / 10
जान्हवी तिच्या सोशल मीडियावरील लाखो चाहत्यांसाठी अनेकदा आकर्षक आणि सुंदर फोटो शेअर करत असते. तिची चांगली फॅन फॉलोविंग आहे.
8 / 10
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच ज्युनिअर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटातून साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
9 / 10
देवरा चित्रपटात जान्हवीसह सैफ अली खान देखील दिसणार आहे. याशिवाय जान्हवी कपूरकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्यात ती आगामी काळात दिसणार आहे. ती शेवटच्या वेळी वरुण धवनसोबत 'बावल'मध्ये दिसली होती.
10 / 10
टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूड