Join us  

सिनेमात दिसत नसली तरी कोट्यधीश आहे कपूर घराण्याची लेक, दोन मुलांचा एकटीच करते सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 4:35 PM

1 / 8
बॉलिवूडमध्ये 'लोलो' नावाने लोकप्रिय झालेली कपूर घराण्याची लेक अभिनेत्री करिष्मा कपूर (Karisma Kapoor) आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्याकडे पाहून वय हा केवळ आकडाच आहे हे जाणवतं.
2 / 8
करिष्माने वयाच्या 16 व्या वर्षी 'प्रेम कैदी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाल्याने तिच्यासाठी ही संधी लगेच चालून आली. मात्र नंतर तिने आपल्या टॅलेंटवर नाव कमावलं.
3 / 8
करिष्मा ही जितकी दिसायला सुंदर आहे तितकाच ताकदीचा अभिनय तिने केला. शिवाय ती उत्तम डान्सरही आहे. शाहरुख खान, माधुरी दीक्षितसोबत तिने 'दिल तो पागल है' सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. मात्र या सिनेमात तिने आपल्या नृत्यकौशल्याने चक्क माधुरीलाही मागे टाकलं.
4 / 8
90 च्या काळात करिष्माचे अनेक सिनेमे गाजले. 'राजा हिंदुस्तानी','जीत','हम साथ साथ है','हिरो नंबर 1','कुली नंबर 1','झुबैदा','रिश्ते' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारल्या.
5 / 8
प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर चढलेल्या करिष्माच्या वाट्याला वैयक्तिक आयुष्यात अनेक अडथळे आले. पती संजय कपूरने तिचा लग्नानंतर अनेक वर्ष छळ केला. काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
6 / 8
करिष्माला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सध्या करिष्मा पुन्हा वैबसीरिजमधून पडद्यावर दिसत आहे. मात्र गेल्या काही वर्षात ना सिनेमा, ना कोणतं काम तरी तिने मुलांचा आणि स्वत:चा खर्च कसा भागवला असा प्रश्न पडतोच.
7 / 8
करिष्मा जरी पूर्वीसारखं सिनेमांमध्ये काम करत नसली तरी इतर ब्रँड्स, जाहिरातींमधून तो कोट्यवधींची कमाई करते. माध्यम रिपोर्टनुसार, ती एकूण संपत्ती 12 मिलियन डॉलर म्हणजेच 87 कोटी रुपये इतकी आहे.
8 / 8
जाहिराती आणि मॉडेलिंग यामधून तिची बक्कळ कमाई होते. ती अनेक ब्रँड्सची अँबेसिडर आहे. तसंच काही टीव्ही शोजमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेतही दिसते.
टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी