By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:59 IST
1 / 7१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या 'परदेस' सिनेमातून अभिनेत्री रातोरात स्टार झाली. ही अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. पहिल्याच सिनेमात शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करून ती प्रचंड लोकप्रिय झाली. 2 / 7फार कमी लोकांना अभिनेत्री महिमा चौधरीचं खरं नाव माहित असेल. ऋतु चौधरी हे नाव बदलून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या सांगण्यावरून तिने आपलं नाव बदलंल असं सांगण्यात येत. 3 / 7यश पायशी लोटांगण घालत असताना अभिनेत्रीवर काळाने घाला घातला. १९९९ साली 'दिल क्या करें' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान महिमाचा अपघात झाला. .या दुर्घटनेत तिला गंभीर दुखापत झाली. 4 / 7यशाच्या शिखरावर असतानाच ती २००६ मध्ये बॉर्बी मुखर्जी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. परंतु, वैयक्तिक मतभेदांमुळे अवघ्या ७ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. २०१३ मध्ये ते दोघं विभक्त झाले.5 / 7त्यानंतर महिमा २०१६ मध्ये आलेल्या 'डार्क चॉकलेट' या चित्रपटात दिसली होती. नंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. २०२२ मध्ये अभिनेत्रीला कर्करोगाचं निदान झालं. या घटनेनंतर महिमाच्या करिअरला ब्रेक लागला. 6 / 7आता महिमा चौधरी कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटातून इंडस्ट्रीत कमबॅक करते आहे.7 / 7या चित्रपटात ती लेखिका 'पुपुल जयकर' यांच्या भूमिकेत दिसत आहे. 'इमर्जन्सी' चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.