Join us  

या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी'शी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 3:30 PM

1 / 7
ही अभिनेत्री मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून ती सध्या बॉलिवूड गाजवतेय. तुम्ही तिला ओळखलं?
2 / 7
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव आहे महिमा मकवाना. महिमाने गेल्या अनेक वर्षांमध्ये बॉलिवूडमधील विविध प्रोजेक्टमध्ये काम केलंय
3 / 7
महिमाची भूमिका असलेल्या शोटाईम या वेबसीरिजला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय. या वेबसीरिजमध्ये तिच्यासोबत इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह प्रमुख भूमिकेत आहेत
4 / 7
महिमा मकवानाच्या ट्रेडिशनल आणि ग्लॅमरस फोटोंना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असते. वयाच्या १० व्या वर्षी महिमाने 'मोहे रंग दे' या मालिकेतून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं.
5 / 7
महिमा मकवानाने 'CID', 'आहट', 'मिलेंगे जब हम तुम', 'झॉंसी की रानी' या लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केलाय. टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा म्हणून महिमाची ओळख आहे
6 / 7
महिमा मकवाना २५ वर्षांची असून ती रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. महिमा 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सलमान खानसोबत पाहुणी म्हणून आली होती
7 / 7
महिमाने महेश मांजरेकर दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक अर्थात 'अंतिम' सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातील महिमाच्या अभिनयाचं कौतुक झालं.
टॅग्स :बॉलिवूडप्रवीण तरडेसलमान खान