खणाची नऊवारी साडी अन् मराठमोळा साज; 'मैंने प्यार किया'मधील सुमनचा पारंपरिक लूक By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 4:32 PM1 / 7जवळपास ३५ वर्षांपूर्वी 'मैंने प्यार किया' हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामुळे अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. 2 / 7मराठी कुटुंबातील ही मुलगी तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली. भाग्यश्रीला ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाने नवी ओळख दिली. 3 / 7अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरूवात ‘कच्ची धूप’ या मालिकेतून केली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि तिच्या करिअरला ब्रेक लागला. 4 / 7आजही चाहत्यांमध्ये भाग्यश्रीची क्रेझ कमी झाली नसून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.5 / 7भाग्यश्रीने अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.6 / 7खणाची साडी त्यावर साजेसे दागिने तसेच नाकात नथ असा पारंपरिक साज तिने केला आहे. 7 / 7भाग्यश्रीचा हा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications