"मध्यरात्री 3 वाजता हिरो फोन करुन घरी बोलवायचा" कास्टिंग काऊचमुळे अभिनेत्रीने गमावले 65 सिनेमे By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 1:40 PM1 / 10बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच हा विषय नवीन नाही. अनेक कलाकरांना या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. काहींना कॉम्प्रमाईज करावं लागलंय तर काहींनी याला विरोध केला आहे. कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवल्याने बऱ्याच अभिनेत्रींना काम मिळणंही बंद झालं आहे.2 / 10अशाच एका अभिनेत्रीचं करिअर कास्टिंग काऊचमुळे उद्धवस्त झालं. तिच्याकडून एक नाही तर अनेक प्रोजेक्ट्स हिसकावून घेण्यात आले आणि दुसऱ्या अभिनेत्रींना दिले गेले.3 / 10सिनेमांमध्ये बोल्ड भूमिका साकारण्यासाठी या अभिनेत्रीला जास्त ओळखलं जातं. ती म्हणजे अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat). मल्लिकाला कास्टिंग काऊचचा अनेकवेळा अनुभव आला आहे. निर्मात्याकडूनच नाही तर अभिनेत्यांकडूनही तिला अशा प्रकारची मागणी झाली आहे. तिने अनेक मुलाखतींमधून याचा खुलासा केला आहे.4 / 10मल्लिकाने २१ वर्षांपूर्वी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. 2003 साली 'ख्वाहिश' या हिंदी सिनेमात ती झळकली. यानंतर एका वर्षात तिचा 'मर्डर' सिनेमा आला. यातील तिचे आणि इम्रान हाश्मीचे सीन्स खूपच गाजले. या सिनेमामुळे ती रातोरात स्टार झाली होती. 5 / 10मल्लिकाचा एक सिनेमा हिट झाला मात्र नंतर तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. अनेक प्रोजेक्ट्स तिच्या हातातून निसटले. ती एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'जर तुम्ही सिनेमाच्या हिरोसोबत कॉम्प्रमाईज केलं नाही तर तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.'6 / 10ती म्हणाली, 'कॉम्प्रमाईज केलं नाही म्हणून सर्वच टॉपच्या अभिनेत्यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. हे अभिनेते त्याच अभिनेत्रींना सिनेमात घेतात ज्या त्यांच्याशी कॉम्प्रमाईज करायला तयार होतात. पण मी त्यापैकी एक कधीच नव्हते.'7 / 10'हिरो तुम्हाला मध्यरात्री ३ वाजता फोन करुन म्हणतो की घरी ये. जर तुम्ही त्या सर्कलमध्ये असाल तर तुम्हाला जावंच लागतं. जर तुम्ही गेला नाहीत तर तुम्हाला सिनेमातून काढून टाकलं जातं. यामुळे माझ्या हातून अनेक सिनेमे गेले आहेत' असंही ती म्हणाली.8 / 10मल्लिकाचं कास्टिग काऊचमुळे खूप नुकसान झालं आहे. हिरोला त्याच्या गर्लफ्रेंडला सिनेमात कास्ट करायचं असल्याने मला अनेकदा बाहेर काढण्यात आलं आहे. कारण मी कधीच हिरोच्या अवाजवी मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. 9 / 10मल्लिका असंही म्हणाली, 'मला आठवतं माझ्याकडे 65 स्क्रीप्ट्स पडलेल्या होत्या. पण मला त्यातली एकही भूमिका मिळाली नाही कारण हिरोने नकार दिला होता. 'मर्डर'नंतर मी अनेक सिनेमात काम केलं पण मला सहाय्यक अभिनेत्रीचीच भूमिका मिळाली. '10 / 10मल्लिका सध्या कुठे गायब आहे असा प्रश्न सगळ्यांना पडतो. ती फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत पॅरिसमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. तिकडे ती आलिशान आयुष्य जगत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications