बॉलिवूडमधून अचानक कुठे गायब झाल्यात 90 च्या दशकातील या 10 सुंदर नट्या? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 8:00 AM1 / 101995 साली मिस इंडिया फायनलिस्ट राहिलेल्या प्रिया गिलने 1996 साली ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पहिल्या चित्रपटाच्या रिलीजनंतर चार वर्षांनी आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटाने प्रियाला खरी ओळख दिली.पण हे यश फार काळ टिकले नाही. तिच्या फिल्मी करिअरला ओहोटी लागली. सध्या ती डेनमार्कमध्ये सेटल झाल्याचे कळते.2 / 10वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात करणा-या किमी काटकरला खरी ओळख मिळाली ती ‘जुम्मा... चुम्मा दे दे’ या गाण्याने. या गाण्यामुळे किमीचे करिअर वेगळ्या उंचीवर गेले. पण अचानक किमीने अनेक ऑफर्सनाकारणे सुरु केले. याचदरम्यान तिने प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनुसोबत लग्न केले. यानंतर ती चित्रपटापासून कायमची दुरावली आणि आॅस्ट्रेलियात स्थायिक झाली.3 / 10 दलाल या चित्रपटात मिथुन व आयशा जुल्कावर अनेक बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले. या चित्रपटातील डबल मिनिंगची गाण्यांवरही वाद झाला. या वादावर स्पष्टीकरण देताना आयशाने माझ्या नकळत हे बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आल्याचा आरोप केला होता. बोल्डनेसचे हे प्रकरण कोर्टातही गेले. या वादानंतर आयशाचे करिअर जवळजवळ संपुष्टात आले आणि आयशा बॉलिवूडमधून बाद झाली. 2003मध्ये आयशाने समीर वाशी नावाच्या तरुणाशी लग्न केले. समीर बिझनेसमॅन असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे.4 / 10मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाली. धडाकेबाज, अशी ही बनवाबनवी, सरकारनामा, कळत नकळत, वजीर, कदाचित अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात तिने भूमिका साकारल्या आहेत. हिना, सैनिक, बंधन या हिंदी सिनेमात ती झळकली. 5 / 10जिच्या निरागस आणि आकर्षक अभिनयाने ‘आशिकी’ चित्रपटात सर्वांची मने जिंकली ती अनु अग्रवाल आज बॉलिवूडमधून पुरती गायब झाली आहे. आशिकी या चित्रपटाने अनु अग्रवाल रातोरात स्टार बनली. पण 1999 मध्ये झालेल्या एका भीषण अपघाताने अनु अग्रवालचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. अनु सध्या बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर बिहारमध्ये राहाते. तिथे ती योगा शिकवते. गेल्या काही वर्षांत अनुमध्ये इतका बदल झाला आहे की तिला आता ओळखणे देखील कठीण झाले आहे. 6 / 10ममता कुलकर्णी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक गणली जायची. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाने लोकांना वेड लावले होते. याचदरम्यान तिचं नाव ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीसोबत जोडलं गेलं. त्यानंतर तिचं बॉलिवूड करिअर संपलं. 2002 मध्ये आलेला ममताचा कभी तुम, कभी हम हा सिनेमा शेवटचा ठरला. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच बॉलिवूडमधून गायब झाली.7 / 10शिल्पा शिरोडकर दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. 2000 मध्ये शिल्पाने लग्न केले. लग्नानंतर पाच वर्षे ती भारतात होती. यानंतर ती पतीसोबत दुबईत स्थायिक झाली.शिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. शिल्पा 2000 नंतर चित्रपटांपासून दूर गेली. 8 / 1090 च्या दशकातील गाजलेल्या जान तेरे नाम, नजर के सामने या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री फरहीन दीर्घ काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 1997 मध्ये फरहीनने क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत गुपचुप लग्न थाटले आणि बॉलिवूडपासून सन्यांस घेतला. लग्नानंतर फरहीन नव-यासोबत दिल्लीला स्थायिक झाली. 9 / 10महेश भट्ट यांची थोरली मुलगी असलेल्या पूजाला 1991 साली प्रदर्शित झालेल्या दिल है के मानता नहीं या चित्रपटाने अपार प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर सडक , फिर तेरी कहानी याद आयी, चाहत या चित्रपटात ती दिसली. त्यानंतर मात्र दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात तिने स्वत:ला झोकून दिले. 2003 मध्ये व्हिजे मनीष मखीजासोबत तिने लग्न केले आणि 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.10 / 10सिनेइंडस्ट्रीत असताना नीलमचं नाव गोविंदा आणि बॉबी देओलसोबत जोडलं गेलं. यामुळे तिच्या पर्सनल लाईफची बरीच चर्चा झाला. दोन अफेअरनंतर 2000 मध्ये नीलमने यूकेचा बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्न केलं. पण काहीच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. 2007 मध्ये टीव्ही अभिनेता समीर सोनी नीलमच्या आयुष्यात आला आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे जिचे नाव अहाना आहे. समीर व नीलम दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications