Join us  

'गुप्त'साठी मनिषा कोईराला नव्हे तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत; फोटोशूट करूनही संधी हुकली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 5:11 PM

1 / 7
अभिनेता बॉबी देओल तसेच काजोल आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांसारखी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळाली.
2 / 7
राजीव राय यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पण, या सिनेमासाठी मनिषा कोईराला नाहीतर रवीना टंडन दिग्दर्शकांची पहिली पसंत होती.
3 / 7
मनिषा कोईरलाने या सिनेमामध्ये शितल चौधरी नावाचं पात्र साकारलं होतं. या चित्रपटातील तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली.
4 / 7
'गुप्त' चित्रपट बॉबी देओल तसेच मनिषा कोईरालासह काजोलच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला.
5 / 7
मीडिया रिपोर्टनूसार, अभिनेत्री रवीना टंडनने चित्रपटाचे प्रमोशनल फोटोशूट करूनही त्यामध्ये काम करण्यास नकार दिला.
6 / 7
काही वैयक्तिक कारणामुळे रवीना टंडनने या सिनेमात काम करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे रवीनाची संधी हुकली आणि हा सिनेमा अभिनेत्री मनिषा कोईरालाच्या पदरी पडला.
7 / 7
त्यामुळे रवीना टंडनच्या जागी अभिनेत्री मनिषा कोईराला हिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
टॅग्स :रवीना टंडनमनिषा कोईरालाबॉबी देओलकाजोलसेलिब्रिटी