Join us  

बॉलिवूड अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट, स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर फ्लॉन्ट केला बेबी बंप, फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 1:33 PM

1 / 7
'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्वीटी' फेम अभिनेत्री सोनाली सहगल गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच सोनालीने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली.
2 / 7
सोनालीने नवऱ्याबरोबरचा एक हटके फोटो शेअर करत प्रेग्नंन्सीची घोषणा केली आहे. यामध्ये अभिनेत्रीचा बेबी बंप दिसत होता. तर तिचा नवरा बिअर पीत दुसऱ्या हातात दुधाची बॉटल घेऊन त्याकडे पाहत होता.
3 / 7
प्रेग्नंन्सीच्या गुडन्यूजनंतर आता सोनालीने मॅटनिर्टी फोटोशूट केलं आहे. यामध्ये सोनालीने लाल रंगाच्या ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.
4 / 7
सोनालीच्या चेहऱ्यावर गरोदरपणाच्या काळातील ग्लो स्पष्ट दिसत आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे.
5 / 7
स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर अभिनेत्रीने मॅटर्निटी फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवरुन अभिने्त्रीने हे फोटो शेअर केले आहेत.
6 / 7
अभिनेत्रीच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत.
7 / 7
सोनाली पाच महिन्यांची गरोदर आहे. 7 जून 2023 रोजी ती बिझनेसमन आशिष सजनानीसोबत लग्नबंधनात अडकली. डिसेंबरमध्ये सोनाली बाळाला जन्म देणार आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीप्रेग्नंसीगर्भवती महिला