डेब्यू सिनेमातूनच चमकलं होतं सोनमचं करिअर, जाणून घ्या का अंडरवर्ल्डच्या भीतीने सोडली इंडस्ट्री By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 7:15 PM1 / 11बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर अभिनयाच्या दुनियेला सोडचिठ्ठी दिली. या अभिनेत्रींमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनमचाही नंबर लागतो. सोनमचं पूर्ण नाव सोनम बख्तावर खान आहे. सोनमने वयाच्या १४ व्या वर्षी 'विजय' सिनेमातून डेब्यू केलं होतं. त्यानंतर तिने २५ सिनेमात काम केलं आणि नंतर बॉलिवूड सोडलं. 2 / 11सोनमला बॉलिवूडमध्ये ओए ओए गर्ल नावाने बोलवलं जात होतं. स्टारडमच्या बाबतीत सोनम कुणाच्याही मागे नव्हती. अनेक सिनेमात तिने आपल्या बोल्ड अंदाजाने फॅन्सचा प्रेमात पाडलं होतं. असं सांगितलं जातं की अनेक प्रोड्यूसर तिला आपल्या सिनेमात घेण्यासाठी तिच्या घरी फेऱ्या मारत होते.3 / 11सोनमने आपल्या अनेक सिनेमात बिकीनीही घातली होती. ज्या सिनेमात ती बिकीनी घालत होती त्या सिनेमांची चर्चा जोरदार रंगत होती. तिची सुंदरता बघण्यासाठी सिनेमा हॉलमध्ये गर्दी होत होती.4 / 11सोनम प्रसिद्ध अभिनेते रजा मुराद यांची नातेवाईक लागते. सोनमचा पहिलाच सिनेमा हिट झाला होता. तिने १९८८ मध्ये आलेल्या तिच्या पहिल्याच 'विजय' सिनेमात अनेक बोल्ड आणि किसींग सीन दिले होते. ज्यामुळे तिची चर्चा जोरदार रंगली होती. 5 / 11पहिल्याच सिनेमात तिने धुमाकूळ घातल्याने तिच्याकडे सिनेमांची लाइन लागली होती. त्रिदेव सिनेमात ओए ओए गाण्यामुळे तर ती प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचली होती. लोक आजही तिचं ते गाणं विसरले नाहीत.6 / 11सोनमने बॉलिवूडआधी तेलुगु समराट सिनेमातून डेब्यू केलं होतं. तिने बंगाली सिनेमातही काम केलं होतं. अखेरची सोनम इंसानियत सिनेमात दिसली होती. हा सिनेमा १९९४ मध्ये आला होता.7 / 11सोनमने १९९१ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक आणि स्क्रीन रायटर राजीव रायसोबत लग्न केलं होतं. राजीव रायसोबत लग्न केल्यावर तिला अंडरवर्ल्डमधून जीवे मारण्याच्या धमक्याही येत होत्या. ज्यानंतर दोघांनी देशाबाहेर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.8 / 11लग्नानंतर हे कपल १० वर्षे सोबत राहिलं आणि १५ वर्षे वेगळे राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. 9 / 11घटस्फोटानंतर सोनमने २०१७ मध्ये मुरली पौडवालसोबत लग्न केलं. सोनमचं करिअर टॉपवर असताना तिने बॉलिवूडला अलविदा केला. ती मुंबईत राहून काम करू शकली असती. पण अंडरवर्ल्डच्या भीतीने तिने काम करण्यास नकार दिला. 10 / 1111 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications