काय सांगता? फॉलोअर्स कमी असल्यामुळे ही अभिनेत्री झाली बेरोजगार, शाहिद कपूरशी आहे कनेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 5:30 PM1 / 9बॉलिवूड असो की टीव्ही इथे टिकण्यासाठी काय आवश्यक आहे? असा प्रश्न कुणी केला तर अभिनय असेच त्याचे उत्तर मिळेल. पण आता समीकरण जरा बदलेय. होय, आता अभिनयापेक्षा तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? हे महत्वाच ठरतेय.2 / 9होय, हे आम्ही नाही तर अभिनेत्री वंदना सजनानीचे मत आहे. वंदना सजनानी बॉलिवूडचा एक चेहरा. पण गेल्या अनेक दिवसांपासून हा चेहरा गायब आहे. 3 / 9वंदना सजनानीने आजतकला दिलेल्या मुलाखतीत एक खळबळजनक दावा केला आहे. इन्स्टाग्रामवर फार सक्रिय नसल्यामुळे मला निर्मात्यांनी काम देण्यास नकार दिला असा चकित करणारा दावा तिने केला आहे. 4 / 9 अनेक नवे कलाकार आॅडिशनसाठी तयारी करताना आपल्या अभिनयावर जास्त लक्ष केंद्रीत करतात. परंतु त्यांनी अभिनयासोबतच सोशल मीडिया हँडलवरदेखील लक्ष देणे गरजेचे आहे, असे तिने म्हटले आहे.5 / 9 एक काळ होता जेव्हा चित्रपटात काम केल्यावर लोक प्रसिद्ध व्हायचे अन् आता प्रसिद्ध लोकांनाच चित्रपटात काम मिळते, असे अनुभवाअंती तिचे मत झाले आहे.6 / 9 अलिकडेच मी सिनेसृष्टीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु अनेकांनी मला रिजेक्ट केले. कारण सोशल मीडियावर मला फारसं कोणी ओळखत नाही. माझे फॉलोअर्स खूप कमी आहेत. त्यांना माझ्या अभिनयात रस नव्हता तर माझ्या मार्फत चित्रपटाची प्रसिद्धी होईल की नाही? याची त्यांना काळजी होती, असे वंदनाने सांगितले.7 / 9त्यानंतर दिल धडकने दो, कर्तव्य, क्या कसूर है यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. तिच्या चित्रपटांना समिक्षकांनी दाद दिली परंतु हिट अभिनेत्री म्हणून मिरवण्याचे भाग्य तिला लाभले नाही.8 / 9वंदना ही प्रसिद्ध अभिनेता राजेश खट्टर याची पत्नी आहे. 2003 साली मै माधुरी दिक्षित बनना चाहती हूं या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.9 / 9राजेश खट्टर हे कोण तर शाहिद कपूरची आई नीलिमा अझीम. पंकज कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर नीलिमा यांनी 1991 मध्ये त्यांनी राजेश खट्टर यांच्याशी लग्न केले होता. शाहिदचा सावत्र भाऊ अभिनेता इशान खट्टर हा त्यांचाच मुलगा. पण इशानच्या जन्मानंतर 2001 मध्ये हे दोघे वेगळे झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications