काजोल ते समीरा रेड्डी! बॉलिवूडच्या 'या' 7 अभिनेत्रींनी लग्नात केला होता महाराष्ट्रीयन लूक By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 11:38 AM1 / 10बॉलिवूड कलाकारांची लग्न म्हणजे जणू सोहळाच असतो.सध्या बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे ज्यांनी त्यांच्या लग्नात मराठमोळा लूक केला होता. या अभिनेत्री कोण ते पाहुयात.2 / 10काजोल - बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे काजोल. अभिनेत्री तनुजा यांची लेक असलेली काजोल मूळची महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे तिने लग्नातही तिचा मराठमोळेपणा जपला. 3 / 10काजोलने तिच्या लग्नात पारंपरिक मराठमोळा लूक केला होता. काजोलने अभिनेता अजय देवगणसोबत लग्नगाठ बांधली आहे.4 / 10समीरा रेड्डी - अभिनेत्री समीरा रेड्डी हिने मराठमोळा बिझनेस मॅन अक्षय वर्दे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे समीराने तिच्या लग्नातही मराठमोळा लूकच केला होता.5 / 10जेनेलिया डिसुझा - जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुख यांची लव्हस्टोरी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचा विवाहसोहळा तर देशभरात गाजला होता.6 / 10जेनेलिया आणि रितेशचं लग्न मराठमोळ्या पद्धतीने झालं होतं. त्यामुळे या लग्नात जेनेलियाने पारंपरिक मराठमोळा लूक केला होता.7 / 10अंकिता लोखंडे - अंकिता लोखंडेचा लग्नसोहळा कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नव्हता. हळदी, मेहंदी असे सगळे फंक्शन तिच्या लग्नात पाहायला मिळाले. या लग्नात तिने केलेला महाराष्ट्रीन लूक जास्त चर्चेत आला.8 / 10नेहा पेंडसे- नेहाने शार्दुल बायससोबत लग्न केलं आहे. या लग्नात तिचा मराठमोळा लूक आणि खासकरुन तिने घातलेली नथ अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली होती. 9 / 10मुग्धा चाफेकर - लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा चाफेकरने रविश देसाईसोबत लग्न केलं आहे. या जोडीने त्यांच्या लग्नात मराठमोळा लूक केला होता.10 / 10गौरी प्रधान - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौरी प्रधान हिने अभिनेता हितेश तेजवानी याच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नात गौरीने मराठमोळा लूक केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications