शूटींगदरम्यान दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्या या नट्या... सेटवर फुलले प्रेम By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 3:34 PM1 / 9 उदिता गोस्वामी - ‘पाप’ या सिनेमाचे शूटींग सुरु असताना उदिता गोस्वामी या सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सूरीवर भाळली. आधी मैत्री झाली आणि मग प्रेम. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर उदिता व मोहितने 29 जानेवारी 2013 मध्ये लग्न केले.2 / 9राणी मुखर्जी - राणी मुखर्जीची लव्हस्टोरी तर सगळयांनाच ठाऊक आहे. 21 एप्रिल 2014 रोजी राणी व आदित्यने इटलीमध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली होती. चित्रपटांच्या शुटींग दरम्यानच राणी आदित्यच्या प्रेमात पडली होती. आदित्य चोप्राचे हे दुसरे लग्न आहे तर राणीचे पहिले. 3 / 9कल्की कोच्लिन - ‘देव डी’ या सिनेमाचे शूटींग सुरु असताना कल्की अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली. 2011 मध्ये कल्की व अनुरागने एकमेकांसोबत लग्न केले. अर्थात 2015 मध्ये कल्की व अनुरागचा घटस्फोट झला. आता कल्की एका इस्रायली पियानोवादकासोबत लिव्ह इनमध्ये राहतेय. दोघांनीही लग्न केलेले नाही. पण त्याच्यापासून कल्कीला एक मुलगा आहे.4 / 9बिंदिया गोस्वामी- अभिनेत्री बिंदिया गोस्वामी गुलाम चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या प्रेमात पडली होते. बिंदिया आणि जे.पी. दत्ता अनेक वर्षे एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले. आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले.5 / 9राम्या कृष्णन - ‘बाहुबली’ या सिनेमात राजमाता शिवगामीची भूमिका साकारणारी साऊथची सुपरस्टार राम्या कृष्णन हिनेही तिच्या दिग्दर्शकासोबत लग्न केले. चंद्रलेखा चित्रपटाच्या सेट वर तिची दिग्दर्शक कृष्णा वाम्सीसोबत ओळख झाली . पहिल्या भेटीनंतर या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री निर्माण झाली. त्यानंतर हळू हळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 11 जून 2011 मध्ये हैदराबाद येथील एका मंदिरात राम्या व कृष्णा वाम्सी यांनी लग्न केले.6 / 9सोनाली बेंद्रे- सोनालीने 12 नोव्हेंबर 2002 रोजी दिग्दर्शक गोल्डी बहेलसोबत लग्नगाठ बांधली. ‘नाराज’ या सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. गोल्डी पहिल्याच नजरेत सोनालीवर भाळला होता. आधी सोनालीच्या मनात तसे काहीही नव्हते. पण कालांतराने ती सुद्धा गोल्डीच्या प्रेमात पडली.7 / 9दीप्ती नवल - दीप्ती नवल हिने दिग्दर्शक प्रकाश झासोबत लग्न केले. चित्रीकरणादरम्यानच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे दोघांनीही लग्न केले. अर्थात आता दोघांचा घटस्फोट झालाय. मात्र तरीही दोघांची मैत्री कायम आहे.8 / 9साधना - आर. के. नय्यर यांच्या अनेक चित्रपटांत साधना दिसली आणि पुढे ती नय्यर यांच्याच प्रेमात पडली. 1966 मध्ये दोघांनीही लग्न केले. साधनाच्या पालकांचा या लग्नाला विरोध होता. कारण नय्यर तिच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते. लग्नानंतर साधनाने चित्रपटांना अलविदा म्हटले. लोकांनी आपले सौंदर्य लक्षात ठेवावे, असे साधनाचे मत होते. 25 डिसेंबर 2015 रोजी साधनाने अखेरचा श्वास घेतला.9 / 9मीना कुमारी -कमाल अमरोही यांच्या नावाचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता. अशावेळी मीना कुमारी त्यांच्या प्रेमात पडली. देखणे व्यक्तिमत्व, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अशा तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या कमाल यांच्या प्रेमात मीनाकुमारी पुरती वेडी झाली होती. कमाल यांनी तिच्या प्रेमाचा स्वीकार करून तिच्याशी ‘निकाह’ केला होता. कमाल अमरोहींनी त्यांची पहिली पत्नी आणि मुलांना गावी पाठवून मीनाकुमारीसोबत संसार सुरु केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications