वय वर्ष 40 पार, अद्याप अविवाहित आहेत 'या' अभिनेत्री, फिटनेसमुळे देतात भल्याभल्यांना मात By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 2:28 PM1 / 7बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं वय आज 40 पार झालंय. मात्र आजही हे कलाकार अविवाहित आहेत. यामध्ये अभिनेत्रीही मागे नाहीत. काही अभिनेत्रींचं लग्नाचं वय उलटून गेलं आहे तरी आपल्या फिटनेसने त्यांनी चाहत्यांना प्रभावित केलंय.2 / 7बॉलिवूड अभिनेत्री, गायिका सोफी चौधरी आज 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. करिना कपूर, आलिया भट,कतरिना कैफ यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींची ती खास मैत्रीण आहे. सौफी एकटीच तिचं आयुष्य एन्जॉय करत आहे. तिच्या गाण्याचेही लोक दिवाने आहेत. 3 / 7सध्या 'आर्या' वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवणारी अभिनेत्री सुश्मिता सेनही अविवाहित आहे. सध्या तिचं वय 48 वर्षे आहे. मात्र लग्नाचा काहीच प्लॅन नाही असं तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिला स्वत:च्या टर्म्सवर आयुष्य जगायला आवडतं. सुश्मिताने अविवाहित असतानाही खूप कमी वयात दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.4 / 7'गदर' फेम अभिनेत्री अमिषा पटेलने 'गदर 2' मधून बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केले. अमिषाचं वय 48 वर्ष आहे मात्र तिच्या फिटनेसमुळे तिने भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. अमिषाही अद्याप अविवाहित आहे. तिचा लग्नाचा कोणताही विचार नसल्याचं तिने सांगितलं आहे.5 / 7अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दिव्या दत्ताही सिंगल आयुष्य जगत आहे. 'भाग मिल्खा भाग','स्पेशल 26', 'वीर जारा', 'बदलापूर' या सिनेमातील तिचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं. दिव्या दत्ता 46 वर्षांची आहे. 6 / 7'रॉकस्टार' फेम अभिनेत्री नर्गिस फाखरी सुद्धा अद्याप अविवाहित आहे. तिचं वय आता 44 वर्षे आहे. अमेरिकेत जन्माला आलेली ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. 'रॉकस्टार' नंतर तिचा एकही सिनेमा फारसा चालला नाही. ती देखील सिंगल आयुष्याचा आनंद घेत आहे.7 / 7या सर्व अभिनेत्रींमध्ये सर्वात मोठी आहे तब्बू. तब्बू आज 52 वर्षांची आहे. अभिनेत्यांमध्ये सलमान खान आणि अभिनेत्रींमध्ये तब्बू यांच्या लग्नाची अपेक्षाच सर्वांनी सोडून दिली आहे. तब्बूही एकटीच आयुष्य एन्जॉय करत आहे. तिच्या करिअरचा ग्राफ मात्र वाढतच जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications