Join us

फळं, पंखा अन् बरंच काही! 'या' गोष्टींना पाहून सेलिब्रिटींची उडते घाबरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 5:39 PM

1 / 8
अनेक लोकांना काही ठराविक गोष्टींचा फोबिया असतो. लहानपणापासूनच किंवा आयुष्यात असं काही घडतं की एखाद्या ठराविक गोष्टीची भीती वाटते. अनेक सेलिब्रिटींनाही असेच फोबिया (Phobia) आहेत जे त्यांनी मुलाखतीत बोलून दाखवले आहेत. कोणाला टोमॅटोचा तर कोणाला पंख्याचा फोबिया आहे. हे ऐकून आपल्याला हसू येईल पण यामागचं काय कारण आहे बघुया.
2 / 8
दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) ला सगळेच घाबरतात. त्यामुळे त्याला कशाची भीती वाटत असेल यावर विश्वासच बसणार नाही. पण तुम्हाला माहितीये का सलमानला लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते. जीव मुठीत घेऊन तो लिफ्टचा वापर करतो. लिफ्टमध्ये जाताच ती बंद पडेल किंवा खाली पडेल असं त्याला वाटत राहतं.
3 / 8
कपूर घराण्यातील अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) सीलिंग फॅनची भीती वाटते असं त्यानेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. म्हणूनच त्याच्या घरी एकही पंखा नाही.
4 / 8
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) कोणालाच घाबरत नसेल असा अनेकांचा गैरसमज आहे. पण खऱ्या आयुष्यात शाहरुख घोड्यांना घाबरतो. करण अर्जुनच्या शूटिंगवेळी घोडेस्वारी करताना शाहरुखला गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्या मनात घोड्यांची भीती कायम राहिली.
5 / 8
अभिनेत्री कॅटरिना कॅफच्या (Katrina Kaif) मनात दोन गोष्टींची भीती आहे. बहुतांश मुलींप्रमाणेच कॅटरिनालाही पालीची भीती वाटते. पण कॅटरिनाला चक्क टोमॅटोची सुद्धा भीती वाटते यावर विश्वासच बसणार नाही. कॅटरिनाच्या गाजलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमात टोमॅटो फेस्टिव्हल झाला होता. याच सीनच्या शूटवेळी तिला टोमॅटोचा फोबिया झाला.
6 / 8
7 / 8
झुरळ, पालींची भीती फक्त मुलींनाच वाटते असं नाही. तर 'रॉकस्टार' रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) तर चक्क झुरळाची भीती वाटते. इतकंच नाही तर एखाजा कोळी दिसला तरी त्याची घाबरगुंडी उडते. त्यामुळे कुठेही झुरळ किंवा कोळी दिसला की रणबीर चार हात लांब राहतो.
8 / 8
रणबीरची बायको आलिया भट (Alia Bhat) सध्या बॉलिवूडमध्ये एक नंबरची अभिनेत्री आहे. राहाच्या आईला आधीपासूनच अंधाराची भीती वाटते. एकटी असेल तर ती रात्री बेडरुममध्ये लाईट चालू ठेवूनच झोपते असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
टॅग्स :शाहरुख खानसलमान खानअभिषेक बच्चनआलिया भट