Bollywood celebs who stuck away from family because of coronavirus covid-19 lockdown PSC
लॉकडाऊनमुळे हे कलाकार आहेत आपल्या कुटुंबियांपासून दूर By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 08:00 AM2020-04-20T08:00:00+5:302020-04-20T08:00:01+5:30Join usJoin usNext सलमान खान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसमध्ये आई, बहीण आणि भाच्यांसोबत आहे. पण त्याचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान त्यांच्या वांद्रे येथील घरी एकटे आहेत. जॅकी श्रॉफचे सगळे कुटुंब मुंबईत आहे तर तो एकटा पुण्यातील त्यांच्या फार्म हाऊसमध्ये आहे. मनोज वाजपेयी देहरादून येथे एका चित्रीकरणासाठी गेला होता. तो कित्येक दिवसांपासून तिथेच आहे. मौनी रॉय एका चित्रीकरणासाठी दुबईला गेली होती. ती तिथेच अडकली असून तिच्या घरी तिची आई नुकतीच बाथरूममध्ये पडली असून तिच्या आईला दुखापत झाली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल मुलगा आणि गर्लफ्रेंड गेब्रिएला सोबत कर्जतमध्ये आहे. तिथे तो एका चित्रीकरणाच्या निमित्ताने गेला होता. संजय दत्तची पत्नी आणि मुलगी दुबईला असून तो मुंबईत सध्या एकटा आहे. जया बच्चन सध्या दिल्लीत आहेत तर त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत आहे.टॅग्स :सलमान खानसंजय दत्तजया बच्चनमनोज वाजपेयीमौनी राॅयअर्जुन रामपालSalman KhanSanjay DuttJaya BachchanManoj BajpayeeMouni RoyArjun Rampal