एकेकाळी फोटोशूटसाठीही नव्हते पैसे; तोच आज आहे 170 कोटींचा मालक, तुम्ही ओळखलं का त्याला By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:11 AM1 / 8कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मोठा स्ट्रगल करुन इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यात असेही काही कलाकार आहेत जे स्टार किड्स असूनही त्यांना संघर्ष काही चुकला नाही.2 / 8सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन याची चर्चा रंगली आहे. स्टार किड असूनही हृतिकला बराच संघर्ष करावा लागला आहे.3 / 8आज हृतिकचं नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत येतं. परंतु, सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे साधे फोटोशूट करण्यापूरतेही पैसे नसायचे. विशेष म्हणजे स्टार किड असूनही त्याने कधी वडिलांची मदत घेतली नाही.4 / 8अलिकडेच प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याने हृतिकविषयी काही खुलासे केले. 5 / 8पहिल्या फोटोशूटच्यावेळी हृतिकने त्याच्या मित्राकडून जॅकेट मागून घातलं होतं, असं डब्बू रतनानीने सांगितलं.6 / 8त्यावेळी हृतिककडे फोटोशूटच्या पेमेंटचे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने २-३ दिवसात पैसे देतो असं सांगितलं होतं.आणि, मग फोटोशूट केलं होतं. विशेष म्हणजे ज्यावेळी हृतिक फोटोशूट करायला आला त्यावेळी तो अभिनेता राकेश रोशनचा लेक आहे हे डब्बू रतनानीला माहित नव्हतं.7 / 8आज हृतिक बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असून तो एका सिनेमासाठी ४०-५० कोटी रुपये घेतो. नुकतंच त्याने फायटर या सिनेमासाठी ५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.8 / 8हृतिकचं आजचं नेटवर्थ २५ मिलिअन डॉलर असल्याचं सांगण्यात येतं. भारतीय चलनानुसार, ही रक्कम १७० कोटी रुपये इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications