ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला... By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 6:56 PM1 / 11बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं सोपं नाही. असंच काहीसं सुरुवातीच्या काळात एका अभिनेत्यासोबत घडलं. दिग्गज व्यक्तीचा मुलगा असूनही त्याला ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट करण्यात आलं. 2 / 11हा लोकप्रिय अभिनेता म्हणजे पंकज कपूर यांचा मुलगा शाहिद कपूर आहे. ज्याने २००३ मध्ये चॉकलेट हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 'इश्क विश्क' हा अभिनेत्याचा पहिला चित्रपट होता.3 / 11शाहिदचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर तो रातोरात स्टार झाला आणि त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या. पण स्टार किड असूनही शाहिदसाठी यशाचा हा प्रवास सोपा नव्हता. 4 / 11एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितलं होतं की, माझे वडील पंकज कपूर आहेत, त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळणं सोपं जाईल असं सर्वांना वाटायचं. पण तसं अजिबात नाही.5 / 11शाहिदने सांगितलं की, ' आयुष्यात एक असा टप्पा होता जेव्हा त्याला १०० वेळा ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्याकडे खायला किंवा ऑडिशनला जायलाही पैसे नव्हते.'6 / 11'मी माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग पाहिले आहेत.' 'वाह लाइफ हो तो ऐसी', 'शिखर' आणि 'दिवाने हुए पागल' सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अभिनेता डिप्रेशनचा सामना करत होता. 7 / 11‘विवाह’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. जो त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. मात्र, त्यानंतरही शाहिदकडे कामाची कमतरता होती. कारण आता त्याला कोणत्या प्रकारच्या भूमिका ऑफर करायच्या हे कोणालाच समजत नव्हतं.8 / 11शाहिद कपूर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात दिसला होता. अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 'उडता पंजाब', 'पद्मावती', 'कबीर सिंह' सारखे हिट सिनेमे दिले आहे. 9 / 11लोकप्रिय अभिनेता जवळपास ३०० कोटींचा मालक आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. शाहिद सोशल मीडियावर खपू एक्टिव्ह असून तो नेहमीच त्याचे जबरदस्त फोटो शेअर करत असतो. 10 / 11शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. त्याला दोन गोड मुलं देखील आहेत. तो नेहमीच आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसतो.11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications