बॉलिवूड अभिनेत्यासोबत समंथा राहत होती Live in Relationship मध्ये; ब्रेकअपनंतर केलं नागा चैतन्यबरोबर लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 12:44 PM1 / 13लोकप्रिय दाक्षिणात्य जोडी समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य लवकरच विभक्त होणार आहेत. 2 / 13चार वर्षांपूर्वी ग्रँड वेडिंग करणाऱ्या या जोडीच्या वैवाहिक जीवनात चढउतार आल्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्यांनी जाहीरपणे चाहत्यांना माहिती दिली.3 / 13समंथा आणि नागा चैतन्य दोघंही लोकप्रिय कलाकार असून वेल सेटल्ड आहेत.त्यामुळेच त्यांची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते.4 / 13समंथा आणि नागा चैतन्य यांच्या लग्नापूर्वी दोघंही कलाविश्वातील दोन दिग्गज कलाकारांना डेट करत होते.5 / 13नागा चैतन्य कमल हासन यांच्या लेकीला श्रुती हासनला डेट करत होता. २०१३ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने त्यांची ओळख झाली होती.6 / 13श्रुती आणि नागा चैतन्य यांच्या अफेअरची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. हे दोघं लग्न करणार असंही म्हटलं जात होतं. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला.7 / 13तर समंथादेखील तिच्या अफेअर्समुळे चर्चेत होती.8 / 13समंथा प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार सिद्धार्थला डेट करत होती. 9 / 13सिद्धार्थने बॉलिवूडमधील 'रंग दे बसंती' या चित्रपटातही काम केलं आहे.10 / 13विशेष म्हणजे सिद्धार्थ आणि श्रुती हासनदेखील एकमेकांना डेट करत होते. मात्र, श्रुतीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचं मन समंथावर जडलं.11 / 13समंथा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यामुळे ते बराच काळ लिव्ह इनमध्येदेखील राहत होते.12 / 13सिद्धार्थ आणि समंथा यांचं रिलेशनदेखील फार कमी काळ टिकलं. त्यानंतर समंथाने नागा चैतन्यला डेट करण्यास सुरुवात केली.13 / 13२०१६ मध्ये समंथा आणि नागा चैतन्य डेट करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications