एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 1:33 PM1 / 6प्रियंका चोप्रा ही अमेरिकेतील प्रसिद्ध गायक निक जोनासची पत्नी झाली आहे. यासोबतच त्याच्या इंस्टाग्रामवर 81 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. पण काही रिपोर्ट्सनुसार, प्रियंका चोप्रा एका प्रायोजित पोस्टसाठी सुमारे 1.80 कोटी रुपये घेते.(फोटो-इन्स्टाग्राम)2 / 6आलिया भटबद्दल बोलायचे झाले तर ती आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे. इतकेच नाही तर तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर 75 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. आलिया एका पोस्टसाठी सुमारे 1 कोटी रुपये घेते. (फोटो-इन्स्टाग्राम)3 / 6बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत़ ते एका पोस्टसाठी जवळपास 50 लाख रूपयांची रक्कम स्विकारतात. (फोटो-इन्स्टाग्राम)4 / 6दीपिका पादुकोणबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे 72 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. दीपिका पादुकोण एका पोस्टसाठी 1.50 कोटीच्या घरात रक्कम घेते. (फोटो-इन्स्टाग्राम)5 / 6शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. अभिनेत्याचे इंस्टाग्रामवर 35 मिलियन फॉलोअर्स आहेत. शाहरुख खान एका पोस्टसाठी 80 ते 1 कोटी रुपये आकारतो. (फोटो-इन्स्टाग्राम)6 / 6बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच अभिनेता शाहिद कपूरचे इंस्टाग्रामवर 38 मिलियन फॉलोव्हर्स असून तो स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 30 लाख ते 50 लाख रुपये घेतो. (फोटो-इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications