Join us  

काही पैशामुळे रखडले, काही मतभेदांमुळे! या सिनेमांच्या वाट्याला आले नाही ‘रिलीज’चे भाग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:57 AM

1 / 9
टाइम मशीन - टाइम मशीन नावाच्या या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. शेखर कपूर यांच्या या सिनेमाची बहुतांश शूटींगही पूर्ण झाले होते. आमिर खान, रवीना टंडन, रेखा, नसीरूद्दीन शाह, गुलशन ग्रोव्हर आणि विजय आनंद अशी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा अगदी शेवटच्या टप्प्यात होता. पण का कुणास ठाऊक शेखर कपूर यांनी सिनेमाचे शूटींग थांबवले. यानंतर ते अमेरिकेला गेले. साहजिकच हा सिनेमा कधीच पूर्ण झाला नाही.
2 / 9
अपने पराए- अमिताभ बच्चन व रेखा यांचा एकत्र पहिला सिनेमा 1976 साली रिलीज झाला होता. नाव होते, ‘दो अनजाने’. पण या सिनेमाच्या चार वर्षाआधी अमिताभ व रेखा या जोडीने एक सिनेमा साईन केला होता. त्याचे नाव होते ‘अपने पराए’. मात्र एक अडचण होती़ निर्मात्याजवळ फार पैसा नव्हता. त्यामुळे पैसा येईल तसा शूटींग सुरु होते. मधल्या काळात अमिताभ व रेखा फेमस झाले होते. त्यांच्याजवळ सिनेमांची रांग लागली होती. अशात या सिनेमासाठी त्यांना कुठून वेळ मिळेल?
3 / 9
देवा - 1978 साली सुभाष घई यांनी अमिताभ बच्चन यांना घेऊन देवा हा सिनेमा बनवण्याची घोषणा केली. शूटींगही सुरु झाले़ मात्र सुभाष घई व अमिताभ यांच्या मतभेदांमुळे आठवडाभरातच हा सिनेमा बंद पडला. सुभाष घई यांनी संतापाच्या भरात हा प्रोजेक्ट कायमचा बंद केला आणि हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही.
4 / 9
सरफरोश - अमिताभ बच्चन यांनी 1979 साली मनमोहन देसाई यांचा सरफरोश हा सिनेमा साईन केला होता. यात त्यांच्यासोबत परवीन बाबी, कादर खान, शक्ती कपूर मुख्य भूमिकेत होते. काही सीनही शूट झाले होते. मात्र अचानक का कुणास ठाऊक मनमोहन देसाई यांनी हा प्रोजेक्ट बंद केला.
5 / 9
मुन्नाभाई चले अमेरिका - मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाईनंतर विधु विनोद चोप्रा यांनी संजय दत्तसोबत ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ हा सिनेमा सुरु केला होता. या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला होता. पण यादरम्यान संजय तुरूंगात गेला आणि सिनेमा थांबला. या सिनेमाच्या स्टोरीबद्दल मेकर्स समाधानी नव्हते. त्यामुळे हा सिनेमा रखडला तो रखडलाच.
6 / 9
शांताराम - हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित होता़ बिग बी यात मुख्य भूमिकेत होते. पण कुठल्याशा कारणाने हा सिनेमा कधीच पूर्ण होऊ शकला नाही.
7 / 9
जमीन - 1988 साली रमेश सिप्पी यांनी विनोद खन्ना, श्रीदेवी, माधुरी दीक्षित यांना घेऊन जमीन हा सिनेमा बनवण्याची घोषणा केली होती. सिनेमाचे बरेचसे शूटही झाले होते. पण पूर्ण सिनेमा शूट होऊ शकला नाही आणि हा सिनेमा रिलीज झालाच नाही,
8 / 9
दस - ‘चल मेरे भाई’नंतर सलमान व संजय दत्त यांनी मुकूल आनंदचा सिनेमा ‘दस’ साईन केला होता. या सिनेमात दोघेही इंडियन सीक्रेट एजंटची भूमिका साकारणार होते. 1997 साली या सिनेमाचे शूटींगही सुरु झाले होते. मात्र अचानक मुकूल आनंद यांचे निधन झाले आणि चित्रपट थांबला. पुढे तो कधीच पूर्ण झाला नाही.
9 / 9
गर्जना - दिग्दर्शक केआर रेड्डी ‘चांदनी’च्या स्टारकास्टसोबत गर्जना सिनेमा बनवू इच्छित होते. श्रीदेवी, विनोद खन्ना, ऋषी कपूर स्टारर या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला होता. पण पेमेंटवरून मतभेद झाले आणि हा सिनेमा कायमचा डबाबंद झाला.
टॅग्स :बॉलिवूड