Join us

मॅगझीनवर परवीन बाबीचा फोटो पाहून परदेशातून भारतात आला, बॉलिवूडचा मोठा व्हिलन बनला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:51 PM

1 / 9
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक व्हिलन झालेत. पण बॉब क्रिस्टोची (Bob Cristo) बातच वेगळी होती. त्याला कधीही कुणी विसरू शकत नाही. बॉब क्रिस्टो ८० आणि ९०च्या काळात हिंदी सिनेमात निगेटिव्ह भूमिकांसाठी लोकप्रिय होते.
2 / 9
बॉब क्रिस्टो यांचा जन्म १९३८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये झाला होता. त्यांचं पूर्ण नाव Robert John Christo होतं. १९४३ मध्ये ते वडिलांसोबत जर्मनीला शिफ्ट झाले. तिथेच त्यांनी शिक्षण घेतलं आणि थिएटरमध्ये काम सुरू केलं. थिएटर करत असताना त्यांची भेट हेल्गा नावाच्या तरूणीसोबत झाली. नंतर दोघांनी लग्न केलं. हेल्गा आणि बॉब यांना ३ मुलं होती. पण एका कार अपघातात हेल्गाचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली मुलं एका अमेरिकन कपलला देऊन बॉब आर्मीच्या एका असायन्मेंटवर व्हिएतनामला गेले.
3 / 9
१९७० सालची गोष्ट आहे. बॉब क्रिस्टो यांनी एक दिवस एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबीचा फोटो पाहिला होता. ते परवीन बाबीवर इतके फिदा झाले की, त्यांना तिला भेटण्याची इच्छा झाली आणि ते भारतात आले. बॉब जेव्हा मुंबईला पोहोचले तेव्हा त्यांची भेट एका फिल्म यूनिटसोबत झाली. बोलता बोलता समजलं की, या यूनिटमधील कॅमेरामन दुसऱ्या दिवशी 'द बर्निंग ट्रेन'च्या सेटवर परवीन बाबीला भेटणार आहे. दुसऱ्या दिवशी कॅमेरामनच्या मदतीने बॉबी क्रिस्टोची परवीन बाबीसोबत भेट झाली.
4 / 9
बॉब क्रिस्टो आणि परवीन बाबी यांची चांगली मैत्री झाली. परवीनने बॉब यांना हिंदी सिनेमात काम देण्याचं आश्वासनही दिलं. यानंतर बॉब क्रिस्टो यांनी १९७८ मध्य अरविंद देसाईच्या 'अजीब दास्तान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. यात त्यांनी रॉबर्टची भूमिका साकारली होती. त्यांनी बॉब यांनी 'पहरेदार', 'क़ुर्बानी' आणि 'कोबरा' सिनेमातही काम करण्याची संधी मिळाली.
5 / 9
१९८० मध्ये परवीन बाबीने बॉब यांची भेट बॉलिवूड दिग्दर्शक संजय खानसोबत करून दिली. संजय खान त्यावेळी त्यांच्या 'अब्दुल्ला' सिनेमाचं काम करत होते. या सिनेमात बॉब यांना जादूगराची भूमिका मिळाली. या सिनेमात राज कपूर, संजय खान आणि झीनत अमानची मुख्य भूमिका होती. तसेच डॅनी यांनी व्हिलनची भूमिका केली होती.
6 / 9
बॉब क्रिस्टो यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमात काम केलं. त्यांनी 'कालिया', 'नमक हलाल', 'डिस्को डांसर', 'नास्तिक', 'नोकर बीवी का', मैं इंतेक़ाम लूंगा', 'हम से है ज़माना', शराबी, 'कसम पैदा करने वाले की', 'राज तिलक', 'मर्द', 'इंसाफ़ मैं करूंगा', 'हुकूमत', 'मिस्टर इंडिया', 'वर्दी', 'तूफ़ान', 'अग्निपथ', 'तिरंगा', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'गुमराह' सारख्या साधारण २०० सिनेमात वेगवेगळ्या भूमिका केल्या.
7 / 9
बॉब क्रिस्टो यांची संजय खानसोबत चांगली मैत्री झाली होती. १९९४ मध्ये संजय खानने बॉब यांना त्यांची पहिली मालिका 'द ग्रेट मराठा' मालिकेत अहमद शाह अब्दालीची भूमिका दिली होती. ही भूमिका चांगलीच गाजली होती.
8 / 9
बॉब क्रिस्टो यांना बॉलिवूड ओळख मिळू लागली होती. त्यामुळे त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी भारतीय महिला नरगिससोबत दुसरं लग्न केलं. त्यानंतर बॉब भारतीय नागरिक झाले. त्यांनी सुनील क्रिस्टो नावाचा मुलगा आहे. बॉब क्रिस्टो यांचा २००१ साली आलेला 'वीर सावरकर'हा अखेरचा सिनेमा होता.
9 / 9
२० मार्च २०११ मध्ये ७२ वर्षाचे असताना हार्ट अटॅकमुळे त्यांचं बंगळुरूमध्ये निधन झालं. बॉब यानी हिंदीसहीत तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड़ आणि इंग्रजी भाषेतील २०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं होतं.
टॅग्स :इंटरेस्टींग फॅक्ट्सबॉलिवूड