Join us

बॉलिवूडची फ्लॉप स्टारकिड, फक्त ३ चित्रपट, एकही ठरला नाही हिट, लग्नानंतर अभिनयाला केला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:12 PM

1 / 7
९० च्या दशकातील एका सुपरस्टारची मुलगी असूनही या अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील प्रवास केवळ चार वर्षेच टिकला.
2 / 7
बॉलिवूडमध्ये नाव कमावणे सोपे नाही. नवोदितांना संधी मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतात, तर स्टार किड्सना संधी मिळाली की, त्यांची क्षमता दाखवून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्याच वेळी, काही जण यामुळे आशा गमावतात आणि अभिनयात नाव कमावण्याचे त्यांचे स्वप्न विसरतात.
3 / 7
त्यापैकी एक म्हणजे ९० च्या दशकातील सुपरस्टार्सची मुलगी, जिने सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र केवळ ३ चित्रपट आणि चार वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर तिने बॉलिवूडला रामराम केला.
4 / 7
ही दुसरी कोणी नसून सुपरस्टार सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आहे. तिने २०१५ मध्ये १९८३ मध्ये रिलीज झालेल्या हिरो या चित्रपटाच्या रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
5 / 7
मार्को भाऊमध्ये ती संजय दत्तच्या मुलीची भूमिका साकारणार होती, जो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजू बाबाचा कमबॅक चित्रपट असणार होता. पण चित्रपट होऊ शकला नाही. त्यात माधुरी दीक्षित आणि क्रिती सनॉनही असल्याचं म्हटलं जात होतं.
6 / 7
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अथिया २०१९ नंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. २०२३ मध्ये तिने बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत लग्न केले, जो एक भारतीय क्रिकेटर आहे.
7 / 7
चार वर्षे डेट केल्यानंतर त्याच्याशी लग्न केले. तर नुकतेच तिने तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे, त्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टॅग्स :अथिया शेट्टी सुनील शेट्टीलोकेश राहुल