तुझ्यापुढे हिरा, चांदी सगळं...; बापाला लेकीचं कौतुक, जान्हवीच्या फोटोंवर बोनी कपूर यांची भन्नाट कमेंट By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:17 PM1 / 8जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जान्हवी ही सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. 2 / 8जान्हवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतेच जान्हवीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 3 / 8या फोटोंमध्ये जान्हवीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. जान्हवीने ऑफ शोल्डर डिझायनर ड्रेस घातला आहे. 4 / 8खड्यांचे कानातले अशी अगदी साधी ज्वेलरी तिने घातली आहे. केस मोकळे सोडत जान्हवीने हा किलर लूक केला आहे. 5 / 8तिने या फोटोला 'एक दिन सोना, एक दिन हिरा' असं कॅप्शन दिलं आहे. 6 / 8जान्हवीच्या या फोटोंवर बोनी कपूर यांनी कमेंट करत लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंवर त्यांनी 'बेटा, तुझ्यापुढे तर हिरा सोना चांदी सगळंच फिकं' असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. 7 / 8जान्हवीने नुकतीच अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. अनंत-राधिकाच्या रिसेप्शनसाठी तिने हा खास लूक केला होता. 8 / 8जान्हवीचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. तिच्या या फोटोंवर चाहच्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications