Join us

नातं, विश्वासाला तडा! या अभिनेत्रींनी मोडला मैत्रिणींचा संसार, त्यांच्या पतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 9:11 PM

1 / 6
मैत्रीपेक्षा मोठं काही नाही, असं म्हटलं जातं. मात्र बी टाऊनमधील काही अभिनेत्रींनी आपल्या मैत्रिणींच्या संसारात मिठाचा खडा टाकला. त्यांच्या पतीवरचं प्रेमाचं जाळं टाकलं आणि त्यांचं घर मोडलं. या अभिनेत्रींमध्ये अमृता अरोडापासून स्मृती इराणींपर्यंतच्या अभिनेत्रींचा समावेश आहे.
2 / 6
स्मृती इराणी ह्या आज देशातील प्रख्यात नेत्या बनल्या आहेत. त्या कारकिर्दीच्या सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. असं सांगितलं जातं की, स्मृती इराणी ह्या मुंबईत आल्या तेव्हा त्या त्यांच्या मैत्रिणीच्या घरात राहिल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांचं त्यांच्या मैत्रिणीच्या पतीसोबत प्रेमप्रकरण सुरू झालं. त्यानंतर झुबिन इराणी यांनी पत्नीला घटस्फोट देऊन स्मृती इराणी यांच्याशी विवाह केला.
3 / 6
प्रख्यात संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया याने सोनिया कपूरसाठी त्याचं २२ वर्षाचं वैवाहिक नातं संपुष्टात आणल्याचं सांगितलं जातं. सोनिया कपूर ही हिमेश रेशमियाच्या पहिल्या पत्नीची मैत्रिण होती. मात्र तीच हिमेश रेशमिया आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाचं कारण ठरली. २०१८ मध्ये हिमेश रेशमियाने पहिला विवाह संपुष्टात आणत सोनिया कपूर हिच्याशी विवाह केला.
4 / 6
अमृता अरोडा हिच्यावरही तिची मैत्रिण निशा राणा हिच्या संसारात फूट पाडल्याचा आरोप होतो. अमृता आणि निशा मैत्रिणी होत्या. मात्र अमृता या मैत्रिणीच्या पतीच्या प्रेमात पडली. त्यानंतर मैत्रिणीचा पती शकील लद्दाक याने पत्नीला घटस्फोट देत अमृता अरोडासोबत विवाह केला.
5 / 6
श्रीदेवीने विवाहित बोनी कपूर यांच्याशी विवाह केला होता. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी मोना शौरी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र श्रीदेवी कधी तिच्या पतीच्या प्रेमात पडली हे तिला कळलेही नाही. त्यानंतर बोनी कपूर यांनी पत्नीला घटस्फोट देत श्रीदेवीसोबत विवाह केला.
6 / 6
हल्लीच नवरी बनलेल्या हंसिका मोटवानीबाबतही असंच म्हटलं जातं. तिनेही तिच्या मैत्रिणीचं घड मोडून विवाह केल्याचं बोललं जातं. हंसिका आणि रिंकी दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र हंसिकाच्या एंट्रीनंतर तिच्या संसारात खटके उडाले आणि रिंकीशी घटस्फोट घेतल्यानंतर हंसिकाने सोहेलसोबत विवाह केला.
टॅग्स :स्मृती इराणीहंसिका मोटवानीअमृता अरोरा