६ वेळा लग्न मोडलं, सातव्यांदा संसार थाटला; आज सवतीसोबत आनंदात राहते 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:11 IST
1 / 10बॉलिवूडमध्ये सिनेमांसोबतच कलाकारांच्या पर्सनल लाईफबाबत अनेक किस्से चाहत्यांना ऐकायला आणि वाचायला आवडतात. कलाकारांच्या नातेसंबंधांवर अनेक चर्चा होत असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, जी सध्या फिल्मी जगतापासून दूर आहे. परंतु पडद्यावरील तिच्या भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. 2 / 10या अभिनेत्रीचं लग्न एक दोन वेळा नव्हे तर तब्बल ६ वेळा तुटले आहे. सातव्यांदा तिने संसार थाटला परंतु पतीसोबतच तिला सवतही मिळाली. सिनेमा साईन करताना कलाकार अनेक निवडक कथा पसंत करतात. पण खऱ्या आयुष्यात या कलाकारांना अनेकदा तडजोड करावी लागते. 3 / 10राम लखन सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीबाबत आपण बोलतोय, ही अभिनेत्री जी सध्या तिच्या सवतीसोबत मैत्रिणीसारखी आणि सवतीच्या मुलांसोबत आनंदाने एकाच घरात राहत आहे. या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात बरेच सिनेमे केले आहेत. 4 / 10राम-लखन, तू नागिन मै सपेरा, कौन करे कुर्बानी, मै और तूम, कच्ची कलीसारख्या सिनेमात ही अभिनेत्री दिसली. तिचं नाव आहे सोनिका गिल. 'राम-लखन' चित्रपटात विव्हियाची भूमिका साकारणाऱ्या सोनिकाच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ती बॉलिवूडमध्ये कशी आली, तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे. तिने अचानक चित्रपटात काम करणे का सोडले? सुभाष घईंनी तिला खरोखरच फटकारले होते का आणि तिच्या लग्नाचे सत्य काय आहे? अभिनेत्रीने एका मुलाखतीत या सर्व प्रश्नांवर मौन सोडलं. 5 / 10सोनिका गिल ही दिल्लीची रहिवासी आहे. ती दिल्लीतील सरकारी शाळेत शिकली. तिने लहानपणापासूनच स्टेज परफॉर्मन्स केले. लैला या चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान सावन कुमार एकदा दिल्लीत आले होते, त्यानंतर त्यांची नजर सोनिका गिलवर पडली, त्यानंतर तिने ऑडिशन दिले, पण इच्छा असूनही तो तिला आपल्या चित्रपटात कास्ट करू शकला नाही. 6 / 10त्यानंतरच सोनिका गिल मुंबईत शिफ्ट झाली आणि संघर्षाची कहाणी सुरू झाली. त्या म्हणाल्या की, त्या काळात केवळ दिसण्याच्या जोरावर हिरोईन बनता येत नव्हते. सुंदर दिसण्यासोबतच अभिनेत्रीला नृत्य आणि अभिनय या कलांमध्येही पारंगत असायला हवे होते.7 / 10मी खूप लहान असताना माझे वडील माझ्या आईला सोडून लंडनला गेले. मी माझ्या आईला लहानपणापासून काम करताना पाहिले आहे. त्यामुळे माझ्या मनात एवढंच होतं की आईसाठी काहीतरी करावं आणि वडिलांना काहीतरी दाखवावं. त्यामुळेच मी माझ्या नावापुढे माझ्या आईचे नाव लावते, माझ्या वडिलांचे नाही असं अभिनेत्रीनं म्हटलं. 8 / 10सुभाष घई यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली, जेव्हा मी त्यांना भेटली तेव्हा मला माहितीही नव्हते, त्यांनी मला ५ दिवसांनी माझ्या घरी भेटायला या म्हटलं, हे ऐकून मला विश्वास बसला नाही. ५ दिवस ५ महिन्यांसारखे वाटले. ५ दिवसांनी मी सुभाष घई यांच्या घरी गेले तेव्हा १ दिवसांत ३ सिनेमा साईन केले असं सोनिका गिलने सांगितले. 9 / 10सोनिका गिलने तिच्या लग्नाच्या अनुभवाबद्दलही स्पष्ट सांगितले. सोनिकाचे लग्न ६ वेळा मोडले, सातव्यांदा तिने संसार थाटला, कुठल्या एका पंडिताने तिला मंगळ आहे असे सांगितले. तेव्हापासून ६ वेळा ठरलेले लग्न मोडले. सातव्यांदा यशस्वीपणे मितेश रुगानीसोबत लग्न झाले. जो एक बिल्डर आणि उद्योगपती आहे. आईच्या निधनानंतर १ वर्षात माझे लग्न झाले. 10 / 10आज सोनिका गिल ४ मुलांची आई आहे. माझी २ मुलेही आहेत. एक २२ वर्षाचा, छोटा १४ वर्षाचा, मितेशचे पहिले लग्न झाले होते, आधीच्या पत्नीसोबत तो आणि सोनिका गिल एकत्रित राहत आहेत. एकाच घरात सवत आणि अभिनेत्री आनंदाने जीवन जगत आहेत.