Flashback 2022 : लग्नाची बेडी! आलिया-रणबीरच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींनी सरत्या वर्षात बांधली लग्नगाठ By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 4:06 PM1 / 9आलिया भट आणि रणबीर कपूरनं एकमेकांना जवळपास ५ वर्ष डेट केल्यानंतर यावर्षी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिल २०२२मध्ये आलिया आणि रणबीर लग्न बंधनात अडकले. कुटुंबीय आणि जवळचं मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थिती हा विवाहसोहळा पार पडला. 2 / 9रिचा आणि अली हे दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. 6 ऑक्टोबरला दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या.3 / 9साऊथ स्टार नयनताराने विग्नेशसोबत 9 जून 2022 रोजी लग्न केलं. दोघे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते.4 / 9अलीकडेच आणखी एक साऊथची अभिनेत्री हंसिका मोटवानीनेही तिचा बॉयफ्रेंड सोहेलसोबत ४ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.5 / 9नागिन फेम मौनी रॉयनं सुद्धा याचवर्षी सूरज नांबियारसोबत सात फेरेही घेतले. दोघांनी 27 जानेवारीला गोव्यात लग्न केले.6 / 9अभिनेता विक्रांत मेस्सीनं ही 14 फेब्रुवारी रोजी शीतल ठाकूरसोबत लग्न केले. दोघे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते.7 / 9 बॉलिवूड सिंगर पलक मुच्छल आणि म्युझिक कंपोझर मिथुन 6 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकले.8 / 9 फरहान अख्तरने 17 फेब्रुवारी रोजी गायिका शिबानी दांडेकरसोबत लग्न केले. फरहानचं हे दुसरं लग्न आहे. 9 / 9देवोलीनाने 14 डिसेंबर रोजी जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications