हिंदुस्तान झिंदाबाद था और रहेगा! ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी लँडिंगनंतर तारा सिंगने केलं इस्रोचं अभिनंदन, म्हणाला- हा अत्यंत... By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:00 AM1 / 8गदर 2 च्या यशादरम्यान, सनी देओलने भारतासाठी नवीन इतिहास रचल्याबद्दल इस्रोच्या टीमचे आभार मानले आहेत. चंद्रावर चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनेत्याने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. 2 / 8 बुधवारी(२३ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला. याबाबत सनी देओल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला आहे. 3 / 8सनी देओल - हा अत्यंत अभिमानास्पद क्षण... हिंदुस्तान झिंदाबाद था और रहेगा. इस्रोचे अभिनंदन...4 / 8इस्त्रोच्या या यशानंतर देशात जल्लोषाचं वातावरण आहे.जगभरात विस्तारलेल्या भारतीयांनी मोठ्या अभिमानाने हा क्षण साजरा केला. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर सत्यात उतरला. अभिनेत्याने या क्षणाचे फोटो शेअर करताना आपल्या गदर चित्रपटाला एक जबरदस्त डायलॉगही लिहिला आहे. 5 / 8सनी देओलने पुढे लिहिले, चंद्रावर 'चंद्रयान ३'चे यशस्वी आणि सॉफ्ट लँडिंग. भारतीय अंतरिक्षातील शोधमोहिमेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण यश.6 / 8सनी देओलचा 'गदर 2'चा (Gadar 2) बॉक्स ऑफिसवरील धुमाकूळ अजूनही सुरुच आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमा अजून बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत ‘गदर २’ बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. 7 / 8सध्या सनी देओल गदर २ च्या यशाचा आनंद लुटतोय. त्यामुळे सध्या तो सर्वत्र चर्चेत आहे. तब्बल २२ वर्षांनी या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकही आतुर होते.8 / 8 'गदर 2' हिट होण्याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त सिनेमा नाही तर लोकांसाठी ते एक इमोशन आहे. तसंच मेकर्सने जून महिन्यात 'गदर एक प्रेम कथा' पुन्हा थिएटर्समध्ये रिलीज केला होता. याचाही सिनेमाला फायदा झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications