Join us

Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:56 IST

1 / 7
विकी कौशलच्या 'छावा'ने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर केवळ 'छावा'चं राज्य आहे.
2 / 7
१४ फेब्रुवारीला लक्ष्मण उतेकरांचा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. 'छावा' प्रदर्शित होऊन आता २२ दिवस झाले आहेत.
3 / 7
'छावा' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. २२ दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
4 / 7
'छावा'ने पहिल्या आठवड्यात २२५.२८ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या आठवड्यात १८६.१८ कोटींची कमाई केली.
5 / 7
तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ८४.९४ कोटी कमावले. तर २२व्या दिवशी ६.३ कोटींचा गल्ला जमवला.
6 / 7
संपूर्ण देशभरात २२ दिवसांत 'छावा'ने ५०२.७ कोटींची कमाई केली आहे.
7 / 7
या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे.
टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदाना