चिरंजीवीच्या अंत्यदर्शनाचे फोटो पाहून तुमचे डोळे देखील पाणावतील, पत्नीला सावरणे झाले होते कठीण By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 3:39 PM1 / 10प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं ७ जूनला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.2 / 10त्यांनी केवळ वयाच्या ३९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.3 / 10चिरंजीवी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे शनिवारी बंगळूरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.4 / 10त्यांचे लग्न अभिनेत्री मेघना राजसोबत झाले असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षं झाले आहेत. मेघना ही गरोदर असून पतीच्या निधनाची बातमी कळल्यानंतर रडून रडून तिची अतिशय वाईट अवस्था झाली आहे.5 / 10२०१८ ला मेघना आणि चिरंजीवी यांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. मेघना आणि चिरंजीवी हे लग्नाच्या १० वर्षं आधीपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी अगदी जवळचे नातेवाईक आाणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केले होते.6 / 10चिरंजीवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनसाठी त्यांच्या घरी आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार त्यांच्या फार्म हाऊसमध्येच करण्यात आले.7 / 10चिरंजीवी यांनी २००९ मध्ये वायूपुत्र या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.8 / 10त्यांनी २२ कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.9 / 10यश, शिवराज कुमार, दर्शन, श्रीमुरली, अभिषेक अंबरीश यांसारख्या दक्षिणेतील कलाकारांनी चिरंजीवीच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले तर मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी सोशल मीडियाद्वारे चिरंजीवी यांना श्रद्धांजली वाहिली.10 / 10चिरंजीवी सरजाने खूपच कमी काळात कन्नड चित्रपटसृष्टीत आपले एक प्रस्थ निर्माण केले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications