‘या’ अभिनेत्रींनी भर तारूण्यात पडद्यावर प्रेग्नंट वुमनची भूमिका साकारली! By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 5:15 PM1 / 11 आपल्या लाडक्या बॉलिवूड अभिनेत्रींनी पडद्यावर भर तारूण्यात आईची भूमिका साकारली आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री, चला तर मग जाणून घेऊयात.2 / 11दीपिका पादुकोण (कल्की, जवान) : बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिकाच्या घरी ८ सप्टेंबर रोजी लक्ष्मी आली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. २७ जून २०२४ रोजी रिलीज झालेल्या ‘कल्की : २८९८ एडी’ या हिंदी चित्रपटात दीपिकाने 'सुमती' नाव असलेल्या आईची भूमिका साकारली आहे. 3 / 11तसेच 'जवान' या ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज झालेल्या चित्रपटात शाहरूख खानची भूमिका असलेल्या आझादच्या आईची भूमिका साकारली आहे.4 / 11क्रिती सॅनन (मीमी) : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट २६ जुलै २०२१ रोजी रिलीज झाला. 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून यात क्रिती सॅननने मीमी राठोड ही भूमिका साकारली आहे. ती सरोगसी पद्धतीने आई बनलेली असते. या चित्रपटासाठी क्रितीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.5 / 11 तृप्ती डिमरी (बॅड न्यूज) : आनंद तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट १९ जुलै २०२४ रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११५.७४ कोटींची कमाई केली. यात ॲनिमल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने आईची भूमिका साकारली आहे. करिअर उंचीवर असताना तृप्तीने आईची भूमिका साकारायलाही हिंमत लागते.6 / 11 कियारा अडवाणी (कबीर सिंह, गुड न्यूज) : २१ जून २०१९ रोजी रिलीज झालेल्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटात कियारा अडवाणीने प्रीती सिक्का ही भूमिका साकारली असून यात ती आईच्या व्यक्तीरेखेत दिसली. 7 / 11तसेच २०१९ रोजी रिलीज झालेल्या 'गुड न्यूज' चित्रपटात तिने मोनी बत्रा ही भूमिका साकारली असून ती आणि करिनाची व्यक्तीरेखा दीपू बत्रा या दोघी आईच्या व्यक्तीरेखेत दिसतात.8 / 11रिचा चढ्ढा (गँग्स ऑफ वासेपूर) : अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने २२ जून २०१२ रोजी रिलीज झालेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटात आईची भूमिका साकारली आहे. तिच्या व्यक्तीरेखेचे नाव नगमा खातून असे आहे. तिला जेव्हा या भूमिकेची ऑफर आली तेव्हा तिने आव्हानात्मक विचाराने साकारली.9 / 11 स्वरा भास्कर (निल बटे सन्नाटा) : २२ एप्रिल २०१६ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटात स्वरा भास्करने चंदा सहाय या सिंगल मदरच्या भूमिकेत दिसते. आई आणि मुलीच्या नात्यावरील हा सुंदर चित्रपट आहे.10 / 11विद्या बालन (कहानी) : अभिनेत्री विद्या बालनने 'कहानी' सिनेमात प्रेग्नंट वुमनची भूमिका साकारली होती. तिचा हा चित्रपट हीट झाला होता. 11 / 11 प्रिती झिंटा (क्या कहना, सलाम नमस्ते, चोरी चोरी चुपके चुपके) : बॉलिवूडची अभिनेत्री प्रिती झिंटा हिने क्या कहना, सलाम नमस्ते आणि चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटांतून आईची भूमिका साकारली आहे. तिच्या करिअरच्या अत्युच्च उंचीवर असताना प्रितीने या चित्रपटातून काम केले. आणखी वाचा Subscribe to Notifications