Join us

अभिनयात फर्स्ट क्लास, पण अभ्यास झिरो; 'या' ५ अभिनेत्री आहेत कमी शिकलेल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 5:53 PM

1 / 10
दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील टॉप अॅक्ट्रेसमध्ये दीपिकाचं आवर्जुन नाव घेतलं जातं. आजवरच्या कारकिर्दीत दीपिकाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, शिक्षणाच्या बाबतीत ती थोडीशी मागे आहे.
2 / 10
दीपिका फक्त १२ वी पास आहे. १२वी पुढे शिक्षणसाठी तिने बेंगळुरुमधील कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता. मात्र, मॉडेलिंगमुळे शिक्षण पूर्ण करणं तिला जमलं नाही.
3 / 10
करिना कपूर खान- बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान हिला वकील व्हायचं होतं. मात्र, सिनेक्षेत्रात आल्यामुळे तिचे हे स्वप्न अपूर्ण राहिलं.
4 / 10
करिनाने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. मात्र, ती शिक्षण पूर्ण करु शकली नाही.
5 / 10
प्रियांका चोप्रा - देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही तिने तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
6 / 10
प्रियांका फक्त १२ वी पास आहे. अभिनय क्षेत्रात आल्यामुळे तिने पुढील शिक्षण घेतलं नाही.
7 / 10
ऐश्वर्या राय बच्चन- बॉलिवूडचं ऐश्वर्य म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. आजवर अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या ऐश्वर्याने जेमतेम शिक्षण घेतलं आहे. ऐश्वर्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं. मात्र, तिचं स्वप्न अर्धवट राहिलं.
8 / 10
ऐश्वर्याने १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यापुढे चित्रपट, मॉडेलिंग यामुळे तिचं पुढील शिक्षण अर्ध्यावर थांबलं.
9 / 10
करिश्मा कपूर - ९०चा काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. आपल्या बोलक्या डोळ्यांनी तिने अनेकांची मनं जिंकली. करिश्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून सध्या तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.
10 / 10
कपूर कुटुंबाची ही लाडकी लेक केवळ सहावी पास आहे. कमी वयात अभिनय क्षेत्राकडे वळल्यामुळे तिला शिक्षण पूर्ण करता आलं नाही.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीदीपिका पादुकोणऐश्वर्या राय बच्चनकरिश्मा कपूरकरिना कपूर