Join us

देशमुखांची सूनबाई जिनिलिया जेवण बनवताना करत नाही तेलाचा वापर, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 12:31 PM

1 / 8
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांच्या लग्नाला नुकतेच ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
2 / 8
जिनिलिया आणि रितेश नुकतेच वेड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.
3 / 8
वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरातून ७० कोटींहून जास्त कमाई केली आहे.
4 / 8
जिनिलिया मराठमोळ्या संस्कृतीच्या प्रेमात आहे आणि तिला महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात.
5 / 8
जिनिलियाला पिठलं भाकर हा पदार्थ खूप आवडतो. तिने सांगितले होते की, “मला पिठलं, भाकरी व ठेचा खूप आवडतो. आई (सासूबाई) दर गुरुवारी पिठलं, भाकरी आणि ठेचा़ बनवतात.”
6 / 8
जिनिलिया स्वतःच्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देते. महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी अधिक उत्तम असतात हे मी अनुभवल्याचे ती आवर्जून सांगते.
7 / 8
पिठल्यामध्येही प्रोटीन आहे. मी जेव्हा जेवण बनवते तेव्हा मी तेल वापरत नाही. शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी जेवण बनवते. कारण त्यामध्येच तेल असतं. मला पुरणपोळी तर खूपच जास्त आवडते.
8 / 8
जिनिलिया देशमुख अस्सल मराठमोळे पदार्थ खाते. त्याबरोबरीने ती घरातही विविध पदार्थ बनवते.
टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुखवेड चित्रपट