Join us

कंगना राणौतचा 'धाकड' FLOP झाल्यानंतर निर्मात्यावर आली ऑफिस आणि बंगला विकण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 3:14 PM

1 / 8
कंगना राणौत (Kangana Ranaut) च्या 'धाकड' या अ‍ॅक्शन चित्रपटाची जोरदार चर्चा होती. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहिल्यानंतर लोकांना कंगनाचा अ‍ॅक्शन मोड आवडेल असे वाटले होते, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका फ्लॉप ठरला, ज्याचा निर्मात्यांनी कधी विचारही केला नव्हता. अशा बातम्या आल्या की चित्रपटाच्या मोठ्या नुकसानीनंतर, चित्रपटाचे निर्माता, सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंटचे दीपक मुकुट यांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे त्यांना कर्ज फेडण्यासाठी त्यांचे ऑफिस आणि बंगला विकावा लागला होता. आता दीपक यांनी स्वत:च या प्रकरणी खुलासा केला आहे. (Photo Instagram)
2 / 8
'धाकड'(Dhaakad)चे निर्माते दीपक मुकुट यांनी अलीकडेच त्यांनी बंगला-ऑफिस विकल्याच्या वृत्तावर आणि चित्रपटाच्या बजेटवर मौन सोडले. (Photo Instagram)
3 / 8
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ते म्हणाला, 'आम्ही 'धाकड' खूप आत्मविश्वासाने बनवला होता. मला माहित नाही काय चूकलं. (Photo Instagram)
4 / 8
दीपक मुकुट म्हणाले की, आम्ही असा स्त्री केंद्रित स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट बनवला याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. अशा शैलीचे चित्रपट जे फारसे बनत नाहीत. ते म्हणाला की मला वाटतं की जनता अजून अशा चित्रपटांसाठी तयार नाही.(Photo Instagram)
5 / 8
'धाकड' फ्लॉप झाल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी निर्मात्याला त्याचा बंगला आणि ऑफिसही विकावे लागले. निर्मात्याने या वृत्तांचे खंडन केले. त्यांनी या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.(Photo Instagram)
6 / 8
दीपक मुकुट म्हणाले यात काहीच तथ्य नाही.चित्रपट फ्लॉप ठरला असेल पण आम्ही आमचे नुकसान बर्‍याच प्रमाणात भरून काढले आहे.(Photo Instagram)
7 / 8
'धाकड' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी एक कोटी रुपयांचीही कमाई केली नाही.या चित्रपटाने देशभरात रिलीजच्या दिवशी केवळ 50 लाखांची कमाई केली होती. हा चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रदर्शित झाला.(Photo Instagram)
8 / 8
'धाकड' हा चित्रपट 1 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म G5 वर प्रदर्शित झाला आहे. OTT वर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.(Photo Instagram)
टॅग्स :कंगना राणौतसिनेमाबॉलिवूड