३ वेळा तयारी केली, तरीही लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनाला येऊ शकले नाहीत अभिनेते धर्मेंद्र, कारण काय? वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:35 PM1 / 10लता मंगेशकर यांचं निधन झाल्याचं कळताच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मोठा धक्का बसला. त्यांना दीदींचं अंत्यदर्शन घेण्याची खूप इच्छा होती. तीन वेळा तयारी करुनही त्यांना अंत्यदर्शनासाठी निघता येऊ शकलं नाही. 2 / 10धर्मेंद्र यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच प्रकृती बिघडल्याचं धर्मेंद्र यांनी म्हटलं. लता दीदी आता या जगात नाहीत हे स्वीकारणंच त्यांना कठीण होत होतं, असं खुद्द धर्मेंद यांनी म्हटलं आहे.3 / 10'मला खूप असहज आणि त्रास होत होता. लता दीदींच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी मी एक नव्हे, तर तीनवेळा तयार होऊ बसलो. पण मी तिथं जाण्यापासून स्वत:ला रोखत होतो', असं धर्मेंद्र म्हणाले.4 / 10लता दीदींना हे जग सोडून जाताना मी पाहू शकत नाही. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच माझी तब्येत बिघडली. मला खूप असहज वाटत होतं, असं धर्मेंद्र म्हणाले. 5 / 10लता मंगेशकर यांचं निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर धर्मेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या ट्विटर हँडलवर लता दीदींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. 6 / 10'संपूर्ण जग आज दु:खी आहे. तुम्ही आज आम्हाला सोडून गेलात यावर विश्वास बसत नाही. तुमची आठवण नेहमीच येईल. लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळो हिच पार्थना', असं कॅप्शन धर्मेंद्र यांनी लता दीदींसोबतच्या फोटोला दिलं होतं. 7 / 10धर्मेंद्र यांनी २०२० मध्येही लता मंगेशकर यांचे आभार व्यक्त करण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. लता दीदींनी धर्मेंद्र यांना एक पोर्टेबल म्युझिक प्लेअर भेट म्हणून दिला होता. ज्यात त्यांची गाणी प्रीलोडेड होती. याबाबत धर्मेंद्र यांनी लता दीदींचे आभार व्यक्त केले होते. 8 / 10लता दीदींनी एकेदिवशी प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचंही धर्मेंद्र यांनी सांगितलं. त्यावेळी लता दीदींसोबत अर्धातास फोनवर संवाद झाला होता आणि त्यांच्यासोबतच्या गप्पांमुळे प्रेरणा मिळाली होती, असंही धर्मेंद्र म्हणाले. 9 / 10लता मंगेशकर यांनी गेल्या काही वर्षांमध्ये फक्त स्वत:ची किंवा कुटुंबीयांची चिंता केली असं नाहीय. तर त्यांचं ज्यांच्यावर प्रेम होतं अशा सर्वांची त्या विचारपूस करत होत्या. त्यांची हीच माणूसकी त्यांना सदैव आमच्यासोबत ठेवेल, असंही धर्मेंद्र म्हणाले. 10 / 10जेव्हा आमची पहिली भेट झाली होती त्यावेळी मी तपकिरी रंगाचं टी-शर्ट परिधान केलं होतं हे त्यांनी एका पुरस्कार सोहळ्यात सांगितलं आणि ते ऐकून मी खरंच आश्चर्यचकीत झालो होतो. त्यांना आमची पहिली भेट लक्षात होती हे पाहून मी त्यावेळी नि:शब्द झालो होतो, अशीही एक आठवण धर्मेंद्र यांनी शेअर केली. आणखी वाचा Subscribe to Notifications