Dia Mirza : हृदयस्पर्शी! "मी आई झाले पण लेक 3 महिने ICU मध्ये होता, आठवड्यातून एकदाच भेटायची परवानगी" By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 11:26 AM1 / 16अभिनेत्री दीया मिर्झा लवकरच अनुभव सिन्हा यांच्या 'भीड' चित्रपटात दिसणार आहे. लॉकडाऊनवर आधारित या चित्रपटात दीयाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. दीया या चित्रपटात आईच्या भूमिकेत आहे. आई झाल्यानंतर ती या व्यक्तिरेखेशी स्वतःला रिलेट करू शकते. 2 / 16लॉकडाऊनच्या काळात आई बनण्याचा अनुभवही दीयाने आता शेअर केला आहे. 'मी अनुभव सिन्हा याला नाही म्हणू शकत नाही. मी अनुभव सिन्हा याच्यासोबत कॅश आणि थप्पडमध्ये काम केलं आहे. भीडसाठी, त्याने मला कॉल केला आणि फक्त सांगितले की या चित्रपटात तुझ्यासाठी काहीतरी आहे.'3 / 16'जे तुझ्या इमेजपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. करशील की नाही माहीत नाही, आधी स्क्रिप्ट वाच मग सांग. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी कोणताही विचार न करता होकार दिला. त्यांनी मला त्यांच्या चित्रपटाचा भाग बनण्याची संधी दिली याचा मला आनंद आहे.'4 / 16'जेव्हा प्रेक्षकही हा चित्रपट पाहतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की यात पारंपरिक दीया अजिबात नाही. ही व्यक्तिरेखा केल्यावर समजले की इथे कोणीही परफेक्ट नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता नक्कीच असते' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 5 / 16आई झाल्यानंतर या आईच्या व्यक्तिरेखेशी ती स्वतःला किती रिलेट करू शकते. याला उत्तर देताना दीया म्हणते, 'मला नेहमीच मातृत्वाची भावना असते. मी खूप दिवसांपासून आई बनले नव्हते, पण शूटिंगदरम्यानही माझ्यात भावनेची कमतरता भासली नसती. मीही त्या मुलीशी भावनिक जोडले होते.'6 / 16'होय, खऱ्या आयुष्यात आई झाल्यानंतर फरक पडतो हे खरे आहे. मला आठवते की माझा मुलगा 6 महिन्यांचा असताना मी त्याला घरी सोडलं आणि शूटिंगसाठी बाहेर गेले. त्यामुळे मी किती हिंमत केली हे माझ्या हृदयाला माहीत आहे. आयुष्य बदललं आहे, माझे बाळ माझ्या जीवनाचे मुख्य केंद्र आहे.'7 / 16लॉकडाऊनवर आधारित या चित्रपटाचा एक भाग असलेल्या दीयाला जेव्हा विचारले की, तिच्यासाठी लॉकडाऊन कसा होता. याला उत्तर देताना दीया तिच्या असुरक्षिततेबद्दल सांगते- 'पहिल्या टप्प्यात मला समजले की मी खूप भाग्यवान आहे की मी माझ्या आईसोबत एका छताखाली आरामात राहत आहे. यादरम्यान मी माझ्या पतीलाही भेटले.'8 / 16'पहिल्या लॉकडाऊनमध्येच आमचं लग्न झालं. त्यावेळी सर्व काही ठीक चालले होते. त्यानंतर पुढच्या लॉकडाऊनमध्ये मी आई झाली. तिथून अडचणींना सुरुवात झाली. माझ्या गरोदरपणात मला एमआरआयची गरज होती आणि मला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते तिथे ही सुविधा नव्हती.'9 / 16'कोरोनामुळे वातावरण असे होते की आपल्याला मर्यादित सुविधांमध्येच जगावे लागले. जे नंतर एक गुंतागुंत बनले आणि सहाव्या महिन्यातच प्रसूती करावी लागली. त्यावेळी मला शक्तीहीन वाटत होते. त्या हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशिन असते तर कदाचित माझी प्रसूती नॉर्मल झाली असती.'10 / 16 'मुलगा झाला तेव्हा त्याला तीन महिने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मला त्याला आठवड्यातून एकदाच भेटण्याची परवानगी होती. दुस-या टप्प्यात माझ्या आजूबाजूचे सर्वजण फक्त टिकून होते. प्रत्येकाच्या स्वतःच्या समस्या होत्या, किती जणांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते' असा वेदनादायी अनुभव दीयाने सांगितला आहे. 11 / 16बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दीयाने मुलाचा जन्माच्या चार महिन्यांनंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. दीया आणि अव्यानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.12 / 1613 / 1614 / 1615 / 1616 / 16 आणखी वाचा Subscribe to Notifications