Join us  

"आम्ही सर्व उद्ध्वस्त झालो होतो; मला अनेक प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आलं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:29 PM

1 / 10
अभिनेत्री दिया मिर्झाने २००१ मध्ये आलेल्या 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आर माधवन आणि दिया मिर्झा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रिलीजच्या २३ वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
2 / 10
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी या चित्रपटाद्वारे दिया मिर्झाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता एका मुलाखतीदरम्यान दियाने खुलासा केला की, रहना है तेरे दिल में फ्लॉप झाल्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला.
3 / 10
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिया मिर्झाने खुलासा केला की, 'रहना है तेरे दिल में' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिला खूप त्रास सहन करावा लागला. दिया म्हणाली, 'आम्ही सर्व उद्ध्वस्त झालो होतो, मला आठवतंय की मला अनेक प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आलं होतं.'
4 / 10
या चित्रपट टेलिव्हिजनवर आल्यावर प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि अनेक वर्षांनी सोशल मीडियावरील चर्चेमुळे या चित्रपटाला दर्जा मिळाला आहे. त्यानंतर या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
5 / 10
अभिनेत्री म्हणाली, 'प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रेमामुळे या चित्रपटाला कल्टचा दर्जा मिळाला आहे. यावरून मला कळलं की, लोकांशी खऱ्या अर्थाने जोडलेल्या चित्रपटासाठी बॉक्स ऑफिस किती महत्त्वाचं आहे. ही एक भेट आहे.'
6 / 10
पुढे मुलाखतीत 'रहना है तेरे दिल में' या अभिनेत्रीने आर माधवन आणि सैफ अली खानसोबत चित्रपटात काम करतानाचा तिचा अनुभवही सांगितला.
7 / 10
दिया म्हणाली, 'मॅडीने याआधीही साऊथ (तमिळ चित्रपट मिन्नले) चित्रपट केला आहे. त्याला त्याची व्यक्तिरेखा चांगलीच माहीत होती. मला अनेकदा असं वाटायचं की तो सेटवरचा गुरू आहे, मार्गदर्शन करत आहे. तो एक जेंटलमन आहे. आमचा एक स्ट्राँग बाँड आहे.'
8 / 10
'सैफ नेहमीच विनोद करून मला हसवायचा. मला त्याच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडायचं. त्याने आपली क्लियॅरिटी आणि ह्यूमरने मला लगेचच कम्फर्टेबल केलं होतं.'
9 / 10
गौतम वासुदेव मेनन दिग्दर्शित 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. आता, तो ३० ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच आज पुन्हा प्रदर्शित होत आहे. माधवनने या चित्रपटात 'शास्त्री' उर्फ ​​'मॅडी'ची भूमिका साकारली होती, तर दिया मिर्झाने 'रीना मल्होत्रा'ची भूमिका साकारली होती.
10 / 10
टॅग्स :दीया मिर्झाबॉलिवूड