काय सांगता! आलिया भटच्या बहिणीबरोबर बॉबी देओलचा झालेला साखरपुडा? मग घडलं असं काही... By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 2:16 PM1 / 9बॉलिवूडच्या बॉबीचा आज ५५वा वाढदिवस आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉबीने अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. पण, त्याला हवं तसं यश मिळालं नाही. 2 / 9'आश्रम' या वेब सीरिजमधून बॉबीने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं. या सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे बॉबी चर्चेत आला होता. 3 / 9बॉलिवूडमधील संपूर्ण कारकीर्दीत बॉबी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला. त्याचं नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. 4 / 9बॉबीने तान्यासोबत लग्न करून संसार थाटला. पण, त्याआधी त्याचे अनेक अभिनेत्रींबरोबर अफेअर होते. 5 / 9'हम साथ साथ है' फेम नीलम कोठारीला बॉबी डेट करत होता. जवळपास पाच वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. पण, नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांना हे रिलेशनशिप मान्य नव्हतं. 6 / 9नीलमनंतर बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीसोबत बॉबीच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. बॉबी देओलने ममताला प्रपोजही केलं होतं. पण, अभिनेत्रीने त्याला नकार दिला. 7 / 9बॉबी देओलचं नाव आलिया भटची बहीण पूजा भटसोबतही जोडलं गेलं होतं. नीलम आणि बॉबी देओलचं ब्रेकअप पूजामुळे झाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. 8 / 9पण, नीलमने एका मुलाखतीत पूजा भट किंवा अन्य कोणत्याच मुलीमुळे त्यांचं ब्रेकअप झालं नसल्याचा खुलासा केला होता. दोघांनीही विचार करून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं होतं. 9 / 9मीडिया रिपोर्टनुसार, बॉबी देओल आणि पूजा भटचा साखरपुडाही झाला होता. पण, याबाबत कोणीही उघडपणे भाष्य केलेलं नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications