IN PICS : सुंदर चेहराही कधीकधी ‘शाप’ ठरतो...! डिनो मोरियाला यामुळेच इंडस्ट्रीनं नाकारलं!! By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 3:36 PM1 / 7कधी कधी गुड लुकिंग, हॅण्डसम असणंही तुमच्यासाठी शाप ठरतं... होय, हे शब्द आहेत बॉलिवूडच्या एका अभिनेत्याचे. त्याच्यासोबत नेमकं हेच घडलं.2 / 7एका मुलाखतीत या अभिनेत्यानं खुद्द हा खुलासा केला. आम्ही बोलतोय ते ‘राज’ या चित्रपटाचा हिरो डिनो मोरिया याच्याबद्दल.3 / 7महेश भट यांच्या ‘राज’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा डिनो या चित्रपटानंतर एका रात्रीत स्टार झाला. हा ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार असं वाटतं असतानाच प्रत्यक्षात डिनो फार काही कमाल करू शकला नाही.4 / 7डिनोला बॉलिवूडमध्ये अपेक्षेइतकं काम मिळालं नाही. असं का? तर आता इतक्या वर्षानंतर डिनोने याबद्दल खुलासा केला आहे.5 / 7तू खूप गुडलूकिंग आहे, या भूमिकेत त्यामुळे तू फिट बसत नाहीस, असं कारण देऊन मला रिजेक्ट केलं गेलं. हे मला विचित्र वाटायचं. एका भूमिकेचा आणि माझ्या दिसण्याचा काय संबंध? असा प्रश्न मला पडायचा, असं डिनो या मुलाखतीत म्हणाला.6 / 7तुम्ही मला कास्ट करा, मी माझा लुक बदलायला तयार आहे. पण बॉलिवूडच्या लोकांनी माझ्या चेहºयापलीकडे कधी पाहिलंच नाही. कधीकधी चांगलं दिसणं सुद्धा बॉलिवूडमध्ये तुमच्यासाठी शाप ठरू शकतं, असं तो म्हणाला.7 / 7अख्खं बॉलिवूड 12 अॅक्टर्सच्या मागे धावत आहेत. यापैकी काही जण गर्दी खेचतीलही. पण बाकी सर्व प्रोजेक्शन आहे. सिनेमात कोण आहे यापेक्षा मेकर्स कथेला महत्त्व देतील, अशी मला आशा आहे, असंही तो म्हणाला. आणखी वाचा Subscribe to Notifications