दिपीका चिखलीया ते स्मृती इराणी... छोट्या पडद्यावर 'या' 5 अभिनेत्रींनी साकारली 'सीता'! By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 3:44 PM1 / 6Top 5 Actress, Sita in Ramayan: संपूर्ण देश उद्याच्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वाट पाहत आहे. घराघरात आनंदाचे वातावरण आहे. राजकीय नेतेमंडळींसह अभिनेतेही या खास क्षणाचा भाग असणार आहेत. रामानंद सागरच्या रामायणातील राम, लक्ष्मण आणि सीताही अयोध्येत पोहोचले आहेत. याच अनुषंगाने जाणून घेऊया 'सीता' ही भूमिका केलेल्या पाच अभिनेत्रींबद्दल...2 / 6दीपिका चिखलिया- रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत सीतेची भूमिका अजरामर करून घराघरात पोहोचलेली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दीपिका चिखलिया. रामायणा मालिकेनंतर ती प्रत्येक घराघरात ओळखली जाऊ लागली. आजही तिची माता सीतेची भूमिका लोकांच्या स्मरणात आहे.3 / 6रुबिना दिलैक- 'देवों के देव महादेव'मध्ये रुबिना दिलैकने माता सीतेची भूमिका साकारली होती. रुबिनाने आपल्या निरागस अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. ही मालिका लोकांना खूप आवडली होती. तसेच मोहित रैनाने या मालिकेत मुख्य अभिनेत्याची म्हणजेच भगवान शंकराची भूमिका साकारली होती.4 / 6देबिना बॅनर्जी- रामानंद सागर यांच्या रामायणनंतर त्यांच्या मुलानेही रिमेकचा प्रयत्न केला. आनंद सागर यांनी पुन्हा एकदा रामायण तयार केले. ज्यासाठी त्यांनी देबिना बॅनर्जीला कास्ट केले. सीतेची भूमिका साकारून देबिना घराघरात प्रसिद्ध झाली.5 / 6स्मृती इराणी- रामानंद सागर यांच्या रामायणाची जितकी चर्चा आहे, तितकीच बीआर चोप्रा यांच्या रामायणाचीही खूप लोकप्रियता दिसून आली. बीआर चोप्रा यांच्या रामायणमध्ये सध्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी माता सीतेची भूमिका साकारली.6 / 6नेहा सरगम- रामायण झी टीव्हीवरही प्रसारित झाले. निर्मात्यांनी ते पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर केले. नेहा सरगमने त्यात माता 'सीते'ची भूमिका साकारली. माता सीतेची भूमिका साऱ्यांना आवडली, पण त्या रामायण मालिकेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications