दिव्या भारती ते श्रीदेवी! बॉलिवूडच्या 5 अभिनेत्री ज्यांच्या मृत्युचं गूढ आजही आहे कायम By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 7:00 AM1 / 13झगमगत्या ताऱ्यांचं बेट म्हणून बॉलिवूडकडे पाहिलं जातं. कलाविश्वात बऱ्याच कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते.2 / 13कलाविश्वातील अनेक गोष्ट उघडपणे चर्चिल्या जातात. मात्र, काही गोष्टींचं गुढ अद्यापही पाहायला मिळतं. 3 / 13आज कलाविश्वातील पाच अशा अभिनेत्रींविषयी जाणून घेऊयात.ज्यांच्या मृत्यूमागचं खरं कारण अद्यापही कोणाला समजू शकलेलं नाही.4 / 13दिव्या भारती - वयाच्या १९ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिव्या भारतीने तुफान लोकप्रियता मिळवली. त्याकाळी तरुणाईमध्ये तिची प्रचंड क्रेझ होती.5 / 13३ एप्रिल १९९३ रोजी राहत्या घराच्या खिडकीतून खाली कोसळून दिव्या भारतीचा मृत्यू झाला. परंतु, हा अपघात होता की हत्या हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. अनेकांच्या मते, दिव्याचा पती साजिद नाडियादवाला यांनी तिची हत्या केल्याचं म्हटलं जातं. तर, काहींच्या मते, खरोखरच खिडकीतून खाली पडून तिचा अपघातात मृत्यू झाला.6 / 13जिया खान - अमिताभ बच्चन यांच्या निशब्द सिनेमातून जियाने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. करिअरच्या अगदी सुरुवातीच्याच काळात जियाचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जियाने आत्महत्या करत तिचं जीवन संपवलं.7 / 13जियाचा मृत्यू तिचा प्रियकर सूरज पांचोली याच्यामुळे झाल्याचं म्हटलं जातं. जियाच्या आईनेदेखील सूरजवर अनेक आरोप केले होते. मात्र, अद्याप याविषयी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.8 / 13श्रीदेवी- बॉलिवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवी यांच्या निधनामुळे तर साऱ्यांनाच धक्का बसला. २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईतील एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृतदेह बाथटबमध्ये आढळून आला.9 / 13श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं जातं. तर, फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, त्यांचा मृत्यू पाण्यात बूडल्यामुळे झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.10 / 13परवीन बाबी- बॉलिवूडची बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून परवीन बाबी यांच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु,त्यांचा अत्यंत दूर्दैवी मृत्यू झाला. २००५ मध्ये त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. जवळपास ३ दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून होता.11 / 13परवीन बाबी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला त्यावेळी त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कोडं आजही कोणाला उलगडलेलं नाही.12 / 13सिल्क स्मिता - दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रचंड बोल्ड अभिनेत्री म्हणून सिल्क स्मिताकडे पाहिलं जात होतं. त्यांच्यावर चित्रपटही करण्यात आला. या सिनेमामध्ये विद्या बालनने सिल्क स्मिता यांची भूमिका साकारली होती.13 / 13सिल्क स्मिता यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. असं म्हटलं जातं, त्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका केल्या त्यामुळे कलाविश्वात त्यांची इमेज खराब झाली होती. ढासळलेल्या प्रतिमेमुळे त्या प्रचंड निराश झाल्या होत्या. त्यामुळे नैराश्य आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. परंतु, आत्महत्येच्या काही तास अगोदर तिने कन्नड अभिनेता आणि तिच्या खास मित्राला फोन केला होता. त्यामुळे तिचा मृत्यू बराच चर्चेत राहिला. आणखी वाचा Subscribe to Notifications