नटखट चिमुरडीला ओळखलंत का? आहे बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री अन् दोन मुलांची आई By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 5:49 PM1 / 6Bollywood Actress Childhood Photo Viral: गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्यापुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो (Actress Childhood Pics) सोशल मीडियावर अनेकवेळा व्हायरल होत असतात.2 / 6बरेच वेळा एखाद्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो पाहून लोक तिला ओळखत नाहीत. ती कोण आहे? यावर अनेक तर्क-वितर्क लढवले जातात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.3 / 6या चिमुरडीच्या डोळ्यातील खोडकरपणा, गोंडस स्मित आणि लाल बिकिनी असा हा एक फोटो आहे. ही चिमुरडी आता बरीच मोठी झाली असून बॉलिवूडमध्ये तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिला 'फॅशन दिवा' असेही म्हणतात.4 / 6आता ती स्वतः दोन मुलांची आई आहे. तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर ती सुमारे ४७६ कोटींची मालकीण आहे. इतकी हिंट दिल्यानंतरही तुम्हाला ही अभिनेत्री ओळखता येत नाही हे नवलंच आहे.5 / 6ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून बॉलिवूडची बेबो करीना कपूर आहे. ती बालपणी प्रचंड खोडकर होती आणि ती तितकीच ती निर्भीड आणि धाडसी आहे.6 / 6करीना कपूर चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. त्याचे नाव शाहिद कपूरसोबत जोडले गेले आहे. मात्र, 2012 मध्ये त्यांनी सैफ अली खानला जीवनसाथी म्हणून निवडले. लग्नाच्या पाच वर्षानंतर करिनाने तैमूरला जन्म दिला आणि २०२१ मध्ये मुलगा जेहचा जन्म झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications