Join us

'चक दे इंडिया'मधील ही अभिनेत्री आठवतेय ना! १३ वर्षांपूर्वी तिने बॉलिवूडला केला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 2:25 PM

1 / 10
अनिता नायर 'चक दे ​​इंडिया' या हिट चित्रपटातून घराघरात पोहचली होती. मात्र १३ वर्षांपासून ती बॉलिवूडपासून दूर आहे.
2 / 10
'चक दे ​​इंडिया'ची गणना बॉलिवूडमधील उत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. हा शाहरुख खान स्टारर चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. हॉकीवर आधारित चक दे ​​इंडियाने थिएटरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
3 / 10
या चित्रपटात शाहरुख खान हॉकी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनेक तरूणी दिसल्या होत्या. आज आम्ही तुम्हाला त्यातील एका नायिकेबद्दल सांगत आहोत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री अनायता नायरनेही काम केले होते.
4 / 10
अनायता नायरने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. यानंतर ती रुपेरी पडद्यापासून दुरावली. अभिनेत्रीचा जन्म १९ जुलै १९८४ रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे झाला.
5 / 10
अनायता आज नुकतीच ४० वर्षांची झाली आहे. ही अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. अभिनय सोडून १३ वर्षे झाली आहेत.
6 / 10
'चक दे ​​इंडिया' सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलेल्या अनायताला बॉलिवूडमध्ये फार मोठी इनिंग खेळता आली नाही.
7 / 10
'चक दे ​​इंडिया' नंतर तिने फोर्स, आशाएं आणि झुठा ही सही या चित्रपटांमध्येही काम केले.
8 / 10
अनायताने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त 'बॉय द पीपल' आणि 'आईजी' सारख्या मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती शेवटची २०११ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता.
9 / 10
बॉलिवूड सोडल्यानंतर ही अभिनेत्री आता स्वतःचे सलून चालवते. ती लोकांचे केस कापून आपला उदरनिर्वाह करत आहे.
10 / 10
अनिताने २०११ मध्ये अखिल नायरशी लग्न केले होते.
टॅग्स :शाहरुख खान