सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 3:30 PM1 / 9सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रंभा आठवते का? जिने लग्नानंतर कलाविश्वाला रामराम केला. भलेही आता ती बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी इतक्या वर्षांनंतरही तिच्या सौंदर्याची चर्चा आहे.2 / 9९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंभाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 3 / 9रंभाने केवळ बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं नाही तर ती दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. 4 / 9सलमान खानसोबत 'बंधन' आणि 'जुडवा' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रंभाने लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला.5 / 9आता ९० च्या दशकातील क्रश मानली जाणारी रंभा जरी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.6 / 9अशा परिस्थितीत या ४८ वर्षीय अभिनेत्री आजही लोकांची मने जिंकते. इतकेच नाही तर ३ मुलांची आई होऊनही ती खूपच तरुण दिसते. 7 / 9२०१० मध्ये कॅनडास्थित उद्योगपती इंद्रकुमार पथमनाथन यांच्याशी लग्न केल्यानंतर रंभा त्याच्यासोबत कॅनडाला शिफ्ट झाली. 8 / 9आता तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ज्यांच्यासोबत ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. 9 / 9रंभाचा फिटनेस आणि ग्लॅमरस लूक पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications