Join us

'गदर'मधला हा बालकलाकार आठवतोय का?, आता दिसतो खूप हॅण्डसम, पाहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 2:31 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा गदर २ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
2 / 9
२००१ साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' चित्रपटाचे खरे तर सगळेच चाहते आहेत. त्याचबरोबर या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांच्या हृदयात एक खास स्थान आहे.
3 / 9
त्यातील एक पात्र म्हणजे 'जीते'ची भूमिका, जो सनी देओल आणि अमिषा पटेलचा मुलगा होता. ही भूमिका साकारणारा अभिनेता उत्कर्ष शर्मा २००१ मध्ये केवळ ७ वर्षांचा होता, परंतु तरीही त्याने चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. पण आज तो पूर्णपणे बदलला आहे.
4 / 9
जीते म्हणजेच उत्कर्ष शर्मा आता २८ वर्षांचा आहे. त्याचवेळी, या २२ वर्षांत उत्कर्षचा संपूर्ण लूकच बदलला आहे. तो आता गोंडस राहिला नसून अत्यंत देखणा झाला आहे.
5 / 9
११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या गदर २ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेलसोबत तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
6 / 9
उत्कर्षचे इंस्टाग्रामवर १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यांच्यासाठी अभिनेता त्याचे नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
7 / 9
'गदर' चित्रपटाव्यतिरिक्त अभिनेता उत्कर्ष 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो'मध्ये बालकलाकार म्हणून काम करताना दिसला होता.
8 / 9
२०१८ मध्ये तो जिनियस या चित्रपटाचा भाग बनला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही.
9 / 9
उत्कर्ष शर्मा गदर २ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :सनी देओलअमिषा पटेल