Join us

'दृश्यम' चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 7:00 AM

1 / 11
२ ऑक्टोबर म्हटलं की दृश्यम चित्रपटातला एक डायलॉग चित्रपट पाहणाऱ्याला नक्कीच आठवत असेल. या दिवशी विजय साळगावकर आणि त्याचे कुटुंबीय पणजीला गेलेले असतात तिथे एक घटना घडते आणि या घटनेभोवती चित्रपटाचे कथानक गुरफटलेले पाहायला मिळते.
2 / 11
१८ नोव्हेंबर रोजी दृश्यम २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या सिक्वेलमध्ये प्रेक्षकांना नेमके काय पाहायला मिळणार याची अधिक उत्सुकता आहे.
3 / 11
निशिकांत कामत दिग्दर्शित दृश्यम चित्रपटात अजय देवगण, श्रेया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर आणि बालकलाकार मृणाल जाधव झळकले होते .
4 / 11
दृश्यम २ चित्रपटात सुद्धा तुम्हाला हेच कलाकार पाहायला मिळणार आहेत. २०१५ नंतर तब्बल ७ वर्षाने या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
5 / 11
या चित्रपटातील बालकलाकार मृणाल जाधव आता अधिकच सुंदर दिसत असल्याने तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
6 / 11
दृश्यम चित्रपटानंतर या सात वर्षात मृणालमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पाहायला मिळत आहे. ही चिमुरडी मृणाल आता खूपच सुंदर दिसते आहे.
7 / 11
बालकलाकार मृणाल जाधव तू ही रे, लय भारी, नागरीक, कोर्ट, टाईमपास २, अ पेईंग घोस्ट आणि अंड्याचा फंडा या चित्रपटांमध्ये मृणालने बालकलाकार म्हणून काम केले आहे.
8 / 11
रितेश देशमुखच्या लय भारी चित्रपटातील तिची रुक्मिणीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
9 / 11
तसेच मृणालने ‘राधा ही बावरी’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमधूनही काम केलेले आहे.
10 / 11
मृणालचे बाबा पोलीस अधिकारी आहेत. मृणालने अभिनय क्षेत्रात जावे ही तिच्या बाबांची इच्छा होती.
11 / 11
मृणाल जाधवने अंड्याचा फंडा, लय भारी, दृश्यम या चित्रपटात काम केले आहे.
टॅग्स :दृश्यम 2अजय देवगण