Join us

प्रेग्नंसीदरम्यान; सेक्स लाइफविषयी पहिल्यांदाच उघडपणे बोलली करिना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 1:30 PM

1 / 11
बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान तिच्या प्रेग्नंसीमुळे प्रचंड चर्चेत असायची. ख-या अर्थाने करिनाने तिची प्रेग्नंसी ग्लॅमरस बनवली होती. पहिली आणि दुस-या प्रेग्नंसीदरम्यानही ती सुपर एक्टीव्ह असायची.
2 / 11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिनाने तिच्या प्रेग्नंसीचे अनुभवावर पुस्कतही लिहीले आहे. यात तिने तिच्या प्रेग्नंंसीनंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांविषयी सांगितले आहे.
3 / 11
पहिली आणि दुसरी प्रेग्नंसी कशाप्रकारे वेगळी होती याविषयी तिने सांगितले की, तैमुरच्या वेळी जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिला त्रास झाला नाही. पण दुसरा मुलगा जैयच्या वेळी तिला प्रचंड त्रास झाला होता.
4 / 11
पहिली प्रेग्नंसी खूप चांगली गेली त्यामुळे दुसऱ्या बाळाचा विचार केला. दुसऱ्यांदा अनेक अनेक समस्याही आल्या. शारिरिक अनेक बदलही झाले. त्यामुळे कधी कधी सगळी काही ठिक होईल का या विचारानेच धडकी भरायची.
5 / 11
प्रेग्नंसीदरम्या सेक्स लाईफबद्दलही तिने काही गोष्टी सांगितल्या. प्रेग्नंसीमध्ये सगळ्यात मोठा आधार हा पतीने देणे गरजेचे आहे. त्या काळात शरिरात झालेल्या बदलांमुळे ती सुंदर दिसेलच हे गरजेचे नाही. त्यामुळे तिच्या शारिरिक बदलही स्विकारावेत. सुंदर दिसण्यासाठी दबाव आणू नये.
6 / 11
त्या काळात सेक्सचा मुड असतो की नाही हेही आपल्याला माहित नसतं, त्या काळात आपल्याला काय वाटतंय अशावेळी तुमच्या पतीनेच मोठा आधार देणे गरजेचे आहे. सैफने मला खूप मदत केल्याचेही करिना सांगते.
7 / 11
विशेष म्हणजे प्रेग्नंसीदरम्यान स्त्री स्वतःला खूप स्पेशल आणि सेक्सी समजत असते. अगदी सैफने देखील ही गोष्ट मान्य केलीय.प्रेग्नंसीदरम्यान एक वेगळाच ग्लो चेहऱ्यावर येतो. त्यामुळे प्रेग्नंसीदरम्यान मी खूप सुंदर दिसत होती हे स्वतः सैफनेच सांगितले.
8 / 11
जसजसा प्रेग्नंसीकाळ वाढत जातो तस तसा आपले शरिरही थकत असते. विशेष सहाव्या आणि सातव्या महिन्यात खूप थकवा जाणवतो. अशावेळी आपण सेक्स करण्यासाठी एक्टीव्ह असू असा समज करणेच चुकीचे आहे. तुमच्या जोडीदाराने तुम्हाला यावेळी समजून घ्यायला पाहिजे.
9 / 11
प्रेग्नंसी काळात तिच्या भावाना समजून घेणे गरजेचे असते. प्रत्येक महिना हा प्रेग्नंसीदरम्यान खास असतो. त्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजे असेही वाटते.
10 / 11
अशावेळीही जोडीदार तुमच्या भावना कळत नसतील तर भविष्यात एक वडिल म्हणून तो कसा असेल? जोडीदाराने सगळ्या बाजूने समजून घेणे गरजेचे आहे. असे करीना म्हणाली.
11 / 11
करीनाने 'जहांगीर' असं बाळाचं नाव ठेवलं आहे. जहांगीरच्या जन्मापासूनच तिने सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. तैमुरप्रमाणे जास्त प्रसिद्धीत आत्तापासूच जहांगीरने राहू नये यासाठी सैफ आणि करिनाने आधीच निर्णय घेतला होता.
टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान