लग्नानंतर दोनच महिन्यांनी एवलिन शर्माने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 1:51 PM1 / 9‘ये जवानी है दीवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लवकरच आई होणार आहे. होय, लग्नानंतर दोनच महिन्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांशी शेअर केली आहे.2 / 9एवलिनने एक फोटो शेअर केला आहे. मी तुला माझ्या कुशीत घेण्याची वाट पाहू शकत नाही..., असे कॅप्शन देत एवलिनने आई होणार असल्याची बातमी शेअर केली आहे. 3 / 9गत 15 मे रोजी ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा डेंटल सर्जन डॉ. तुषान भिंडीसोबत एवलीनने लग्नगाठ बांधली होती. 4 / 9लग्नानंतर महिनाभराने त्यांनी लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.5 / 9एवलिन व तुषानची पहिली भेट 2018 साली झाली होती. दोघेही एका ब्लाइंट डेटवर एकमेकांना भेटले होते. 6 / 9दोघांच्या मित्रांनी ही ब्लाइंड डेट अरेंज केली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. 2019 मध्ये सिडनीच्या हार्बर ब्रीजवर गुडघ्यावर बसून तुषानने एवलिनला प्रपोज केले होते.7 / 92012 मध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री एवलिन एवलिन शमार्चा जन्म जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झाला. 8 / 9चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी युकेमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले. रणबीर कपूर आणि दीपिकाच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील भूमिकेनंतर एवलिन प्रकाशझोतात आली.9 / 9 मैं तेरा हिरो,जब हॅरी मेट सेजल, साहो या सिनेमातही ती दिसली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications