Join us  

Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : घटस्फोटाआधीच हार्दिक पांड्याने केला मोठा गेम, नताशा नाही तर या व्यक्तीच्या नावावर केलीय प्रॉपर्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:08 AM

1 / 9
नताशा स्टेन्कोविकशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याला त्याच्या एक्स पत्नीला भरपाई म्हणून मोठी रक्कम द्यावी लागू शकते.
2 / 9
अहमदाबाद मिररच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की घटस्फोटानंतर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के भाग नताशाला द्यावा लागेल अशी चर्चा रंगली आहे.
3 / 9
आता अशा परिस्थितीत हार्दिककडे किती कोटींची संपत्ती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा क्रिकेटर एकूण ९१ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.
4 / 9
हार्दिकचे मुंबईत ३० कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. याशिवाय त्यांचे वडोदरा येथे एक आलिशान घर आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.
5 / 9
अफवांच्या मते, जर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के रक्कम त्याच्या एक्स पत्नीला द्यावी लागली तर त्याला एकूण ६२ कोटी रुपयांचे नुकसान होईल.
6 / 9
पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे घटस्फोटापूर्वीही हार्दिक पांड्याने त्याच्या संपत्तीतील ५० टक्के रक्कम दुसऱ्याच्या नावावर केली होती.
7 / 9
नुकताच त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. ज्यामध्ये तो सांगतो की त्याने त्याच्या घरापासून त्याच्या कारपर्यंत सर्व काही त्याच्या आईच्या नावावर केले आहे.
8 / 9
व्हिडिओमध्ये हार्दिक म्हणतो की, माझा काही नेम नाही, त्यामुळे मी माझ्या नावावर काहीही ठेवणार नाही. पुढे जाऊन मला पन्नास टक्के इतर कोणाला द्यायचे नाहीत. हे मला खूप टोचेल.
9 / 9
गेल्या काही दिवसांपासून नताशा आणि हार्दिक यांच्या वेगळे झाल्याची चर्चा सुरू होती. अखेर काल त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते विभक्त झाल्याचे जाहीर केले.
टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्या